

UKSSSC
esakal
उत्तराखंड अधीनस्थ सेवा निवड आयोगाने (UKSSSC) घेतलेल्या लेखपाल, पटवारी आणि बीडीओ/व्हिडीओ भरती परीक्षेतील प्रश्नांच्या उत्तरांवरून वाद निर्माण झाला आहे. काही प्रश्नांना दोन-दोन पर्याय योग्य असल्याचा दावा करत उमेदवारांनी उत्तराखंड उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी न्यायमूर्ती पंकज पुरोहित यांच्या एकलपीठाने राज्य सरकार आणि UKSSSC बोर्डाला चार आठवड्यांत आपले उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.