covid-19: उमा भारती एम्समध्ये दाखल; बाबरी प्रकरणी कोर्टात उपस्थित राहण्याची इच्छा

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 28 September 2020

उमा भारती यांना कोरोनाची लागण झाली आहे.

नवी दिल्ली- भाजपच्या जेष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री उमा भारती (Uma Bharti) यांना कोरोना (Coronavirus) झाल्यानंतर त्यांना आज एम्स, ऋषिकेश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. भारती यांनी ट्विट करुन यासंबंधीची माहिती दिली आहे. हॉस्पिटमध्ये दाखल होण्याची त्यांनी तीन कारणे सांगितली आहेत, डॉक्टर हर्षवर्धन खूप काळजी करत होते, रात्री अचानकपणे खूप ताप आला होता आणि हॉस्पिटलमध्ये तणासणी झाल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला तर परवा दिवशी लखनऊ सीबीआय कोर्टात हजर होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.  

रेल्वेचा एसी प्रवास महागणार; प्रवाशांना यूजर फी द्यावी लागणार

बाबरी पाडल्याप्रकरणी लखनऊ सीबीआय स्पेशल कोर्ट 30 सप्टेंबर रोजी आपला निकाल देणार आहे. 28 वर्ष जुन्या असलेल्या या प्रकरणात उभा भारती यांच्याशिवाय भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्यासह अन्य काही आरोपी आहेत. या दिवशी कोर्टात हजर होण्याची इच्छा उभा भारती यांनी व्यक्त केली आहे. 

अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण होताना दिसत आहे. उमा भारती यांना कोरोनाची लागण झाली आहे. उमा भारती या हिमालयात काही दिवसांसाठी गेल्या होत्या. तिथं शेवटच्या दिवशी त्यांनी कोरोना चाचणी करून घेतली तेव्हा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांनी काही दिवस हरिद्वार इथल्या क्वारंटाइन सेंटरमध्ये उपचार घेतला आहे. 

शेतकरी तर वोट बँक, त्यांना दुखावून कसे चालेल म्हणत भाजप खासदाराने काढला पळ

हिमालयातील यात्रा संपल्यानंतर शेवटच्या दिवशी प्रशासनाला विनंती करून कोरोना टेस्टसाठी टीम बोलावली. आधी तीन दिवसांपासून सतत ताप होता. हिमालयात असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रोटोकॉल, सोशल डिस्टन्सिंग यांचे पालन केले. तरीही माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, अशी माहिती भारती यांनी ट्विटरवरुन दिली होती. 

भारतातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अनेक लोकांना कोरोनाची बाधा होत आहे. देशात कोरोनाबाधितांचा आकडा 60 लाखांच्या पुढे गेला आहे. शिवाय कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्याही वाढली आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी जारी करण्यात आलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uma Bhartiadmitted in aiims hospital due to coronavirus