
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री NTR यांच्या मुलीची आत्महत्या
दिवंगत अभिनेते आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांची मुलगी आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची मेहुणी के उमा माहेश्वरी यांचा सोमवारी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. उमा माहेश्वरी या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या आणि गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. (uma maheshwari late actor andhra politician ntr daughter dies by suicide)
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार माहेश्वरी यांनी हैदराबाद येथील जुबली हिल्स येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मृतदेह त्यांच्या बेडरूममध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. प्राथमिक तपासणीनुसार, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या नैराश्यात गेल्या होत्या. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून मृतदेह उस्मानिया रुग्णालयात हलवण्यात आला आहे, असे जुबली हिल्सचे पोलिस अधिकारी राजशेखर रेड्डी यांनी सांगितले.
हेही वाचा: Sanjay Raut | राज ठाकरेंच संजय राऊतांच्या बाबतीतल भाकीत खरं ठरलं?
दरम्यान तेलुगु देसम पार्टी (TDP) चे संस्थापक एनटीआर यांच्या चार मुलींमध्ये त्या सर्वात लहान होत्या. एनटीआर म्हणून ओळखले जाणारे एनटी रामाराव यांनी 1982 मध्ये तेलुगू स्वाभिमानाचा नारा देत टीडीपीची स्थापना केली होती आणि नऊ महिन्यांच्या आत पक्षाला सत्तेवर आणले होते. त्यांचे जावई चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील बंडानंतर त्यांना सत्तेतून बाहेर फेकल्यानंतर काही महिन्यांनी 1996 मध्ये वयाच्या 72 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
हेही वाचा: 5G स्पेक्ट्रम लिलाव संपला, 1.5 लाख कोटींहून अधिकची लागली बोली
Web Title: Uma Maheshwari Late Actor Andhra Politician Ntr Daughter Dies By Suicide
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..