

UN Map Row Deepens as Arunachal Pradesh Shown Separately While Aksai Chin Location Also Raises Questions for India
sakal
नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रांनी नुकत्याच प्रकाशित केलेल्या जगाच्या नव्या नकाशामध्ये अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीन हा प्रदेश भारत-चीन सीमावादातील स्वतंत्र प्रदेश म्हणून दाखविण्यात आला आहे. त्यामुळे या नव्या नकाशाविषयी वादाला तोंड फुटले आहे. या ठरावाचा अर्थ कोणत्याही विशिष्ट नकाशाला, नकाशा-प्रक्षेपणाला किंवा राष्ट्रीय सीमांच्या विशिष्ट चित्रणाला मान्यता देणे असा होत नाही, असे भारताने स्पष्टीकरण दिले आहे.