
एका सासूने आपली हरवलेली सून परत मिळावी म्हणून जीभ कापून देवाला अर्पण केली. महिलेच्या तोंडातून रक्तस्त्राव होऊ लागल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अंधश्रद्धेच्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.
रांची (झारखंड): एका सासूने आपली हरवलेली सून परत मिळावी म्हणून जीभ कापून देवाला अर्पण केली. महिलेच्या तोंडातून रक्तस्त्राव होऊ लागल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अंधश्रद्धेच्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.
पोलिस युवतीला म्हणाले; अगोदर नाचून दाखव...
खरसावन जिल्ह्यातील सरायकेला परिसरात ही घटनी घडली. लक्ष्मी निराला या महिलेला प्रथम स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना जमशेदपूर येथे हलविण्यात आले आहे. लक्ष्मी यांना सध्या बोलता येत नसले तरी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी या घरकाम करून कुटुंबाला हातभार लावतात. १४ ऑगस्ट रोजी लक्ष्मी यांची सून ज्योती मुलासह बेपत्ता झाली आहे. त्यांनी शोध घेतला पण न सापडल्यामुळे पोलिसांकडे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. याबाबत तपास सुरू आहे. पण, लक्ष्मी यांनी देवाकडे प्रार्थना सुरू केली. सून सापडावी म्हणून महादेवाच्या मंदिरात गेल्या आणि ब्लेडच्या सहाय्याने आपली जीभ कापून ती अर्पण केली.
पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला अन् बसला धक्का...
लक्ष्मी यांचा पती नंदूलाल म्हणाले, सून आणि नातू बेपत्ता झाल्यापासून लक्ष्मी काळजीत आहे. तिने कोणाच्या तरी सल्ल्यानुसार जीभ देवाला अर्पण केली आहे. अंधश्रद्धेतून ही घटना घडली आहे.