esakal | छोटा राजनची कोरोनावर मात; AIIMS मधून पुन्हा 'तिहार'मध्ये रवानगी
sakal

बोलून बातमी शोधा

छोटा राजनची कोरोनावर मात; AIIMS मधून पुन्हा 'तिहार'मध्ये रवानगी

छोटा राजनची कोरोनावर मात; AIIMS मधून पुन्हा 'तिहार'मध्ये रवानगी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : कुप्रसिद्ध अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची बातमी गेल्या शुक्रवारी आली होती. त्यानंतर अगदी काही वेळातच तो मेला नसून अद्यापही जीवंत असल्याचं स्पष्टीकरण 'एम्स' हॉस्पिटलकडून (AIIMS) देण्यात आलं होतं. आता छोटा राजन कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या संक्रमणातून छोटा राजन बरा झाला असून त्याला एम्समधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अत्यंत कडक सुरक्षेखाली त्याला पुन्हा एकदा तिहार जेलमध्ये नेण्यात आलं आहे. अनेक मोठ्या गुन्हांमुळे तुरुंगात असलेल्या छोटा राजनला तिहार तुरुंगामध्ये कोरोना विषाणूची बाधा झाली होती. 22 एप्रिल रोजी त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता.

गेल्या शुक्रवारीच अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या. कोरोना संक्रमण झाल्यावर त्याला दिल्लीत एम्समध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याची प्रकृती स्थिर होती, मात्र तब्येतीची तक्रार असल्याने त्याला काही दिवसांपूर्वी 'एम्स'मध्ये दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी दुपारी त्याच्या मृत्यूच्या अफवा पसरल्या होत्या, पण अखेर 'एम्स'ने तो अद्याप जीवंत असल्याचे स्पष्ट केलं होतं.

हेही वाचा: पहिला डोस घेतल्यानंतरही कोरोना झाल्यास, दुसरा घ्यावा का?

७० हून अधिक गुन्हे नोंद असलेला छोटा राजन

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनवर हत्या, अपहरण यांसारख्या गंभीर गुन्हांशी संबंधित एकूण ७० हून अधिक प्रकरणे नोंद आहेत. तसेच त्याला पत्रकार ज्योति डे यांच्या हत्येप्रकरणी देखील दोषी ठरवण्यात आलं आहे. त्याला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली असल्याने तो तिहार जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. गेल्या आठवड्यात मुंबईच्या विशेष सीबीआय न्यायालयाने हनीफ लकडावाला याच्या हत्येप्रकरणी छोटा राजन आणि त्याच्या हस्तकाला निर्दोष मुक्त केले. छोटा राजन १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी आहे. छोटा राजनवर सर्वाधिक गुन्हे महाराष्ट्रात दाखल आहेत, पण कारागृहाच्या आतील गँगवॉरच्या भीतीने त्याला कधीही मुंबईच्या जेलमध्ये ठेवण्यात आलेले नाही. २०१५ ला त्याला विदेशातून गुन्हेगार हस्तांतरणाच्या मार्फत त्याला भारतात आणण्यात आले आणि तेव्हापासून त्याला तिहार जेलमध्येच ठेवण्यात आले. तिहारमध्ये असतानाच त्याला कोरोना झाला आणि त्यानंतर त्याला एम्समध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर एम्समध्ये उपचार सुरू आहेत.

loading image