आंध्रातील बेरोजगारांना एक हजाराचा भत्ता मिळणार 

पीटीआय
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

अमरावती (पीटीआय) : मुख्यमंत्री युवा नेष्ठाम योजनेअंतर्गत आंध्र प्रदेश सरकारच्या वतीने उद्यापासून बेरोजगार युवकाला दरमहा एक हजार रुपये भत्ता दिला जाणार आहे. या योजनेसाठी राज्यातील सुमारे 2 लाखांहून अधिक बेरोजगार युवकांनी नोंदणी केली आहे. नोकरी मिळेपर्यंत हा भत्ता दिला जाणार असून, तसेच उच्च शिक्षणासाठीदेखील आर्थिक हातभार राहावा, हा उद्देश या योजनेमागचा आहे. 

2014 च्या विधानसभा निवडणुकीत तेलगू देसम पक्षाने बेरोजगार भत्ता देण्याचे आश्‍वासन दिले होते. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू उद्या स्वत: लाभार्थ्यांना बेरोजगार भत्ता प्रमाणपत्राचे वितरण करतील, असे सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. याशिवाय बेरोजगारांशीदेखील ते संवाद साधणार आहे. या वेळी तेरा जिल्ह्यांतील सुमारे 400 बेरोजगार लाभार्थी हजर राहणार आहेत. तसेच ऑटोमोबाईल क्षेत्रातील उच्चपदस्थ अधिकारीदेखील कार्यक्रमात सहभाग घेणार आहेत. 

यादरम्यान स्थानिक पातळीवर मंत्र्यांकडून राज्यातील 175 मतदारसंघांत बेरोजगारांना भत्ता प्रमाणपत्र दिले जाणार आहे. सरकारी सूत्राच्या मते, एकूण 12 लाख युवकांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्‍यता असून, त्यासाठी वार्षिक 1200 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बेरोजगाराच्या खात्यात हा भत्ता जमा होणार आहे. या योजनेचा हेतू केवळ भत्ता देणे नाही, तर बेरोजगारांचा कौशल्य विकास आणि प्रशिक्षणार्थी सेवेची संधी उपलब्ध व्हावी, हादेखील आहे.

Web Title: The unemployed in Andhra will get a thousand allowance