Bharat Jodo Yatra: भाजप देशात एक भाषा, एक संस्कृती लादाण्याच्या तयारीत- राहुल गांधी

यात्रा गुरूवारी तामिळनाडूमध्ये पोहचली
Farmers, workers, small and medium businessmen are facing immense hardship in the country.
Farmers, workers, small and medium businessmen are facing immense hardship in the country.esakal

Rahul Gandhi: कन्याकुमारीपासून सुरू झालेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा 150 दिवसांत तीन हजार 570 किलोमीटर अंतर कापणार आहे. बारा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातून जाताना राहुल गांधी व त्यांचे 119 सहकारी दररोज सात तास चालत आहेत. ते रोज 20 ते 22 किलोमीटर अंतर चालतात. ही यात्रा गुरूवारी तामिळनाडूमध्ये पोहचली होती.

राहुल गांधी यांनी सभा घेवून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी म्हणाले " भाजपने देशात जो द्वेष आणि संताप पसरवला आहे. त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात होत आहे. देशात बेरोजगारीने सर्वोच्च पातळी गाठली आहे, आणि भारतात आजवर सर्वोच्च महागाई वाढली आहे. देशात शेतकरी, कामगार, लहान आणि मध्यम व्यापारी प्रचंड त्रासाला सामोरे जात आहेत.

तर भाजपला देशात 1 भाषा आणि 1 संस्कृती लादायची आहे. त्यावर गांधी म्हणाले आम्हाला एकता हवी आहे, परंतु एकरूपता नको आहे. देशातील विविधतेचा आदर कराया पाहिजे, या सुंदर देशात प्रत्येक राज्य, प्रत्येक संस्कृती आणि प्रत्येक भाषेला स्थान आहे आणि त्या स्थानाचा आदर केला पाहिजे. राहुल गांधी पुढे म्हणाले भाजप विरोधी राज्यात राज्यापालांना हस्तक्षेप करण्याचा अधिकार का आहे. राज्यपालांना जनता निवडून देत नाही. जनतेने निवडून दिलेल्या सरकारला पाडण्याचा भाजप आणि RSS ला काय अधिकार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com