esakal | "बेरोजगारीचा प्रश्न कोणत्याही सरकारकडून सुटणारा नाही"; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचा दावा
sakal

बोलून बातमी शोधा

Rajiv Kumar

त्याचबरोबर रोजगारासंबंधीची सरकारची धोरणं काय आहेत? याचा खुलासाही त्यांनी केला आहे. एका मुलाखतीत ते बोलत होते.

"बेरोजगारीचा प्रश्न कोणत्याही सरकारकडून सुटणारा नाही"; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचा दावा

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

देशातील रोजगाराचा प्रश्न हा कोणत्याही सरकारकडून सुटणारा नाही, असा दावा नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांनी केला आहे. त्याचबरोबर रोजगारासंबंधीची सरकारची धोरणं काय आहेत? याचा खुलासाही त्यांनी केला आहे. एका मुलाखतीत ते बोलत होते. 

EPFO : भविष्य निर्वाह निधीवर मिळणार इतकं व्याज; जाणून घ्या कसा चेक करणार बॅलन्स

देशातील वाढत्या बेरोजगारीच्या समस्येवर भाष्य करताना डॉ. राजीव कुमार म्हणाले, "ही समस्या अशी आहे जी कधीही कोणत्याही सरकारकडून सुटणारी नाही. कारण रोजगाराचा जो प्रश्न आहे तो पूर्णपणे आपल्या अर्थव्यवस्थेशी, विकास दराशी, गुंतवणुकीशी संबंधीत आहे. त्यामुळे जोपर्यंत या गोष्टी सुधारत नाहीत तोपर्यंत रोजगारातही सुधारणा होणं अशक्य आहे." 

आमच्या पुण्यात सगळंच भारी; राहण्यासाठी हे उत्तम शहर

यासाठी सरकारने जे धोरण अवलंबलं आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार बोलून दाखवलं आहे. त्यांनी खासगी क्षेत्राला, खासगी गुंतवणुकदारांना आवाहन केलं आहे की त्यांनी पुढे येऊन रोजगाराच्या क्षेत्रात आपली गुंतवणूक वाढवावी. ही गुंतवणूक वाढवण्यासाठी सरकारला जे काही करावं लागेल ते सरकार करणार आहे. यासाठी खासगी गुंतवणुकदारांना सुविधा देणं, त्यांचं प्रमोशन करणं या सगळ्या गोष्टी करायला आम्ही तयार आहोत, असंही डॉ. राजीव कुमार यांनी म्हटलं आहे.  

ई श्रीधरन असणार केरळमधील भाजपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा; पक्षाने केली घोषणा

तसेच शिक्षण क्षेत्रातून जी नवी पिढी शिकून बाहेर पडत आहे. तसेच इंजिनिअरिंग आणि मेडिकल क्षेत्रातील मुलांसाठी सरकारला काहीतरी करावं लागेल यासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना डॉ. राजीव कुमार म्हणाले, "सरकार जास्तीत जास्त काय करु शकते, त्यांच्यासाठी एखादा बेरोजगार लाभ किंवा भत्ता देऊ शकते किंवा किमान वेतनाप्रमाणे काहीतरी सुरु करु शकते. पण यामुळे रोजगार वाढणार नाही. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की यावर कोणताही ठोस उपाय नाही. असा उपाय शोधण्याचा प्रयत्न केला तरी तो होऊ शकणार नाही. 
 

loading image
go to top