esakal | आमच्या पुण्यात सगळंच भारी; राहण्यासाठी हे उत्तम शहर
sakal

बोलून बातमी शोधा

pune

देशात 10 लाखाहून जास्त लोकसंख्येच्या शहरांमध्ये राहण्यासाठी सर्वांत योग्य शहरांच्या यादीत पुणे शहराचा दुसरा क्रमांक लागला आहे.

आमच्या पुण्यात सगळंच भारी; राहण्यासाठी हे उत्तम शहर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : देशात 10 लाखाहून जास्त लोकसंख्येच्या शहरांमध्ये राहण्यासाठी सर्वांत योग्य शहरांच्या यादीत पुणे शहराचा दुसरा क्रमांक लागला आहे तर प्रथमस्थानी बेंगलुरु शहराची निवड झाली आहे. Housing and Urban Affairs Ministry ने गुरुवारी 'Ease of Living Index (EoLI) 2020 & Municipal Performance Index (MPI) 2020' ची यादी जाहीर केली आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पूरी यांनी ही यादी आणि रिपोर्ट जाहीर केला आहे. विशेष म्हणजे या यादीमध्ये दिल्ली शहर या दोन्ही कॅटेगरीमध्ये 10 व्या क्रमांकावर देखील पोहोचू शकलेले नाहीये. दिल्ली 13 व्या स्थानावरच अडकलेले होते. 'Ease of Living Index'  क्रमवारीमध्ये पुणे शहराला 66.27 गुण मिळाले आहेत तर बेंगलुरुला 66.70 गुण मिळाले आहेत.

देशातील 111 शहरांचे झाले सर्वेक्षण
राहण्यासाठी सर्वांत बेस्ट शहरांच्या क्रमावरीमध्ये देशातील 111 शहरांनी सहभाग घेतला होता. या शहरांना दोन कॅटेगरीमध्ये विभाजित करण्यात आलं. पहिल्या कॅटेगरीत अशा शहरांना ठेवलं गेलं ज्यांची लोकसंख्या 10 लाखाहून अधिक होती तर दुसऱ्या कॅटेगरीत अशी शहरे होती ज्यांची लोकसंख्या 10 लाखाहून कमी होती. ही शहरे राहण्यासाठी कितपत योग्य आहेत, तसेच विकासासाठी किती कामे केली गेली आहेत आणि त्याचा लोकांच्या आयुष्यावर कसा सकारात्मक परिणाम झाला आहे, याबाबतचे निकष ठेवून ही क्रमवारी ठरवण्यात आली आहे. 

हेही वाचा - 'स्मार्ट सिटीं'च्या रॅंकिंगमध्ये पिंपरी-चिंचवडने टाकले पुण्याला मागे

2018 मध्ये शहरांच्या रँकिंगला सुरुवात
2018 मध्ये पहिल्यांदा शहरांची रँकिंग करण्यात आली होती. आता दुसऱ्यांदा अशी क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. या कॅटेगरीमध्ये प्रामुख्याने तीन मुद्दे आहेत. यामध्ये राहण्यासाठीची गुणवत्तेसाठी 15 टक्के गुण ठेवण्यात आले होते. तसेच विकासाची स्थिरता कशी आहे, यासाठी 20 टक्के गुण ठेवले होते. तर उर्वरित 30 टक्के गुण लोकांमध्ये जाऊन केल्या गेलेल्या सर्वेक्षणाअंती दिले गेले आहेत. तसेच 49 इंडिकेशन्स होते ज्याआधारावर हे रँकिंग केलं गेलं आहे. 

32 लाख लोकांच्या मतांचा समावेश
या शहरांसाठी 14 कॅटेगरी बनवल्या गेल्या होत्या. या कॅटेगरींमध्ये त्या शहरातील शिक्षणाचा दर्जा, आरोग्य, निवास, स्वच्छता, वाहतुक व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, आर्थिक विकासाचा स्तर, आर्थिक स्तर, पर्यावरण, इमारती यांसारख्या मुद्यांचा समावेश आहे. त्यानंतर त्या शहरांतील लोकांमध्ये जाऊन सर्वेक्षण केलं गेलं. हे सर्वेक्षण 19 जानेवारी 2020 ते मार्च 2020 मध्ये करण्यात आलं. या सर्वेक्षणात 32 लाख 20 हजार लोकांनी आपलं मत नोंदवलं. ही मते ऑनलाईन फिडबॅक, क्यू आर कोड, फेस टू फेस याशिवाय अनेक माध्यमातून नोंदवण्यात आली आहेत. त्यानंतरच ही क्रमवारी ठरवण्यात आली आहे. 

हेही वाचा - ताज महलमध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवाच; नोकरभरती रद्द केल्याच्या रागातून केला प्रताप

10 लाखांहून जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांची क्रमवारी
शहर - गुण

 1. बेंगलुरू- 66.70
 2. पुणे- 66.27
 3. अहमदाबाद- 64.87
 4. चेन्नई- 62.61
 5. सूरत- 61.73
 6. नवी मुंबई- 61.60
 7. कोयम्बटूर- 59.72
 8. वडोदरा-59.24
 9. इंदौर- 58.58
 10. ग्रेटर मुंबई- 58.23

हेही वाचा - बोगद्यातून संसदेत जाणार पंतप्रधान, उपराष्ट्रपती; अशी असणार आहे नवी संसद

10 लाखांहून कमी लोकसंख्या असणाऱ्या शहरांची क्रमवारी
शहर- गुण

 1. शिमला- 60.90
 2. भुवनेश्वर- 59.85
 3. सिल्वासा -58.43
 4. काकिनाडा- 56.84
 5. सेलम- 56.40
 6. वेल्लोर- 56.38
 7. गांधीनगर- 56.25
 8. गुरूग्राम -56.00
 9. दावनगेरे -55.25
 10. तिरुचिरापल्ली- 55.24
loading image
go to top