दिल्लीत जामियाबाहेर पुन्हा गोळीबार; तिसरी घटना

वृत्तसंस्था
Monday, 3 February 2020

जामियाबाहेर झालेल्या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. गोळीबाराची माहिती मिळताच जामिया मिलिया इस्लामियाबाहेर लोक जमा झाले आणि त्यांनी निदर्शने केली. पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले आहे, गेट क्रमांक 5 आणि 7 मधील सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्यात येईल.

नवी दिल्ली : दिल्लीतील जामिया मिलिया विद्यापीठाबाहेर पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली असून, दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जामिया मिलिया विद्यापीठाच्या गेट नंबर 5 जवळ रविवारी रात्री उशिरा गोळीबार झाला. दुचाकीवरून आलेल्या दोन संशयितांनी गोळीबार केला. गेल्या चार दिवसांतील दिल्लीतील गोळीबाराची ही तिसरी घटना आहे. जामिया, शाहीनबाग आणि आता पुन्हा जामिया विद्यापीठाबाहेर गोळीबार झाला आहे. या गोळीबारामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. 

जामियाबाहेर झालेल्या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. गोळीबाराची माहिती मिळताच जामिया मिलिया इस्लामियाबाहेर लोक जमा झाले आणि त्यांनी निदर्शने केली. पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले आहे, गेट क्रमांक 5 आणि 7 मधील सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्यात येईल. सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसीच्या विरोधात जामिया परिसरात आंदोलन सुरु आहे. रविवारी शाहिनबाग येथे सायंकाळी पाचच्या सुमारास एका युवकाने गोळीबार केला होता. गोळीबार करणाऱ्या युवकाचे नाव कपिल गुज्जर (रा. दल्लुपुरा, उत्तर प्रदेश) असे आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आणि आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. या गोळीबारात कोणीही जखमी झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unidentified Men Open Fire Outside Delhis Jamia Millia Islamia