Budget 2019 : स्वच्छ पाण्यासाठी आता 'हर घर नल, हर घर जल'

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 5 जुलै 2019

- पाणी पुरवठ्यासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना.

- जलशक्ती मंत्रालयाची होणार स्थापना.

अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा (एनडीए-2) अर्थसंकल्प आज (शुक्रवार) सादर करण्यात येत आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून हा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. या अर्थसंकल्पात पाणी पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने अनेक तरतूदी करण्यात आल्या.  

सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने स्वतंत्र जलशक्ती मंत्रालयाची स्थानपा केली जाणार आहे. तसेच 2024 पर्यंत देशातील प्रत्येक घराला नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे सरकारचा संकल्प आहे. त्यानुसार सरकार प्रयत्न करणार आहे. त्यामुळे आता सरकारकडून स्वच्छ पाण्यासाठी 'हर घर नल, हर घर जल' योजना आणण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Union Budget 2009 Water Ministry will be Created Soon