Budget 2021: 'प्रो अॅक्टिव्ह बजेट'; पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया

टीम ई-सकाळ
Monday, 1 February 2021

आज सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Union Budget 2021: नवी दिल्ली : आर्थिक वर्ष 2021-22 साठीचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केला आहे. अर्थसंकल्पातून करदात्यांना कोणताच दिलासा मिळालेला नाही. तर 75 वर्षांवरील व्यक्तीच्या लोकांना रिटर्न भरावा लागणार नाही. दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलवर कृषी अधिभार लागू केला आहे. यामध्ये पेट्रोलवर अडीच तर डिझेलवर चार रुपयांचा अधिभार लागू केला आहे. याचा परिणाम ग्राहकांवर होणार नाही असं सांगितलं जात आहे.

Union Budget 2021 : 'मोदी सरकार सुटकेसवालं नाही'; मेड इन इंडिया टॅबवरून आलंय बजेट

आज सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अभूतपूर्व काळात सादर झालेल्या बजेटचा 'प्रो अॅक्टिव्ह बजेट' अशा उल्लेख पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. या छोट्याशा भाषणात त्यांनी अनेक गोष्टींवरही त्यांनी प्रकाश टाकला.

पंतप्रधान म्हणाले...

- आमच्या सरकारने बजेट पारदर्शक असायला हवं यासाठी प्रयत्न केला.
- अर्थसंकल्पाला सर्वच स्तरातून प्रतिसाद
- दक्षिणेतील, पुर्वोत्तर आणि उत्तरेतील राज्यांच्या विकासावर भर
- किनारपट्टीच्या राज्यांमध्ये उद्योगांसाठी प्रोत्साहन
- कोरोनाशी लढण्यासाठी अर्थसंकल्पाद्वारे मदत होईल.
- इन्स्फ्रास्ट्रक्चर 
- तसेच रोजगारनिर्मितीसाठी मोठी तरतूद
- शेतकऱ्यांना आणि एपीएमसीला आणखी बळ मिळण्यासाठी विविध तरतूदी करण्यात आल्या आहेत.

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Union Budget 2021 has been presented amid unprecedented circumstances says PM Narendra Modi