टेलीकॉम सेक्टरसाठी 26,316 कोटींच पॅकेज, 31 हजार गावांना मिळणार कनेक्टिविटी

केंद्र सरकारने दूरसंचार क्षेत्रात मोठी घोषणा केली आहे.
Ashwini Vaishnaw
Ashwini Vaishnawesakal

केंद्र सरकारने दूरसंचार क्षेत्रात मोठी घोषणा केली आहे. देशातील सुमारे ३१ हजार गावांना मोबाईल कनेक्टिव्हिटी देण्यासाठी सरकारने २६,३१६ कोटी रुपयांचे पॅकेज मंजूर केले आहे. हे पॅकेज सॅचुरेशन कव्हरेज म्हणून ओळखले जाईल. केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. बीएसएनएलचे पुनरुज्जीवन करण्यासाठी बुधवारी मंत्रिमंडळाने १.६४ लाख कोटी रुपयांच्या पुनरुज्जीवन पॅकेजला मंजुरी दिली होती.(Union Cabinet Approves Rs 1 64 Lakh Crore BSNL Revival Package Announces Ashwini Vaishnaw)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त आश्वासन दिले होते की सरकार आता प्रत्येक योजना संपृक्त पातळीवर घेऊन जाऊ इच्छित आहे. म्हणजेच देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत विकास पोहोचेल, असा प्रयत्न केला जाईल.

Ashwini Vaishnaw
Bank Holidays: ऑगस्टमध्ये बँकांना अर्धा महिना सुट्ट्या, पहा सुट्ट्यांची लिस्ट

'सरकारने गेल्या ७-८ महिन्यांत गतिशक्ती फ्रेमवर्क वापरून हे केले आहे. सॅटेलाइट इमेजिंग आणि टेलिकॉम नेटवर्किंगमधील डेटाचा वापर करून सर्वेक्षण देखील केले. यावरून देशातील २५ हजार गावांमध्ये नेटवर्क सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे दिसून आले असल्याचे दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले.

अश्विन यांनी दिलेल्या माहितीनुसार, २६,६१६ गावांमध्ये मोबाइल कनेक्टिविटीसाठी काम केले जाईल. यासाठी २६, ३१६ कोटी रुपयांचे सॅचुरेशन पॅकेजला मंजुरी दिली आहे. देशाच्या शेवटच्या भागापर्यंत विकास पोहोचवणे हे विद्यमान सरकारचे ध्येय असल्याचे अश्विन म्हणाले. त्याचबरोबर बीएसएनएलची सेवा नसलेल्या सुमारे ६ हजार गावांमध्ये खासगी कंपन्यांनाही 3जी सेवेवरून 4 जीमध्ये अपग्रेड करण्यास मान्यता देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Ashwini Vaishnaw
Don't Talk To Me; संसदेत स्मृती इराणींवर सोनिया गांधी संतापल्या

केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी बीएसएनएलच्या पुनरुज्जीवनासाठी १.६४ लाख कोटी रुपयांच्या पॅकेजला मंजुरी दिली. पॅकेजचे तीन भाग आहेत - सेवा सुधारणे, हिशोब वही आणि फायबर नेटवर्कचा विस्तार करणे.

सरकार बीएसएनएलला 4G सेवा देण्यासाठी स्पेक्ट्रम वाटप करणार आहे. तसेच, 'बीएसएनएल मजबूत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अशी माहिती केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाबाबत दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com