esakal | मोदी सरकारचा मोठा निर्णय; रब्बी पिकांच्या MSP मध्ये वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

 Narendra modi

केंद्र सरकारने २०२२-२३ या वर्षासाठी रब्बी पिकांची किमान आधारभूत किंमत (MSP) वाढवली आहे.

मोदी सरकारचा मोठा निर्णय; रब्बी पिकांच्या MSP मध्ये वाढ

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - केंद्र सरकारने २०२२-२३ या वर्षासाठी रब्बी पिकांची किमान आधारभूत किंमत (MSP) वाढवली आहे. यात गहू, हरभरा, मसूर, सूर्यफूलांच्या किंमतीत वाढ केली. गव्हाची MSP ४० रुपयांनी वाढवून प्रति क्विंटर २ हजार १५ रुपये इतकी केली आहे. इतर सर्व प्रमुख रब्बी पिकांच्या किंमतीतही वाढ केली आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मोहरीच्या MSP मध्ये ४०० रुपये प्रति क्विंटल अशी वाढ केली आहे. यामुळे मोहरीची MSP ५ हजार ५० रुपये प्रति क्विंटल इतकी झाली आहे. वनस्पती तेलाच्या उत्पादनात वाढीसाठी यामुळे मदत होणार आहे.

हेही वाचा: भाजप खासदाराच्या घराबाहेर फेकले बॉम्ब; राज्यपालांनी व्यक्त केली चिंता

हरभरा आणि मसूरच्या MSP मध्ये मोठी वाढ झाली असून हरभऱ्याच्या दरात प्रति क्विंटल १३० रुपये तर मसूरच्या दरात ४०० रुपये वाढ केली आहे. यामुळे हरभऱ्याची एमएसपी ५ हजार २३० रुपये तर मसूरची MSP ५ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल इतकी झाली आहे.

loading image
go to top