एसटी संपावर तोडगा?; पवार - कृती समितीच्या बैठकीला सुरूवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar and Anil Parab
एसटी संपावर तोडगा?; पवार - कृती समितीच्या बैठकीला सुरूवात

एसटी संपावर तोडगा?; पवार - कृती समितीच्या बैठकीला सुरूवात

मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST employee) संपावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्यांद्री अतिथी गृहावर बैठकीला सुरुवात झाली आहे. यामध्ये परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) आणि एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने आणि संबंधित अधिकाऱ्यांसह एसटी महामंडळातील संयुक्त कृती समिती मधील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती आहे.

हेही वाचा: ZP,महानगरपालिकेच्या निवडणुकीत 'आमचं नवीन ठरलयं'; मंडलिकांचा इशारा

आतापर्यंत एसटी प्रशासनाने संपकऱ्यांना भत्ते, वेतनवाढ देऊनही संपकरी संप मागे घेत नसल्याने दोन महिन्यांतरच्या या बैठकीला आता वेगळं महत्व प्राप्त झाले आहे. संपात सहभागी असलेली एकमेव महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेने सुद्धा माघार घेतल्याने सध्या संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्वच शिल्लक राहिले नाही. त्यामुळे शासनासोबत होणाऱ्या संपकऱ्यांचा वाटाघाटी थांबल्या आहे.

त्यामुळे शरद पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीकडे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. या बैठकीनंतर मोठा तोडगा निघण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Sharad PawarST
loading image
go to top