esakal | केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्र्यांना कोरोनाची लागण
sakal

बोलून बातमी शोधा

ashwini kumar chaube

देशात सध्या कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. याआधीही अनेक मंत्री, खासदार, आमदार आणि नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्र्यांना कोरोनाची लागण

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पाटणा - केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार चौबे यांना कोरोनाची लागण झाली आहे. ट्विटरवरून त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी म्हटलं की, कोरोनाची सुरुवातीची लक्षणे दिसल्यानंतर आज चाचणी करण्यात आली. त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. 

चौबे यांनी सांगितली की, माझी प्रकृती सध्या ठीक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने आयसोलेशनच्या सर्व नियमांचे पालन करत आहे. माझी विनंती आहे की जे लोक गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी स्वत: आयसोलेट व्हावं आणि चाचणी करून घ्यावी. 

देशात सध्या कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. याआधीही अनेक मंत्री, खासदार, आमदार आणि नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अश्विनीकुमार चौबे हे बिहारचे असून केंद्राच्या राजकारणातील भाजपच्या दिग्गज नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो.

हे वाचा - कोरोना लशीचा 5 कोटीचा स्टॉक; आता केंद्र सरकारला ठरवायचंय- अदर पुनावाला

बिहारमध्ये कोरोनाचे एकूण 2 लाख 50 हजार 449 रुग्ण सापडले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 1 हजार 379 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 5 हजार 85 सक्रीय रुग्ण आहेत. तर आतापर्यंत एकूण 2 लाख 43 हजार 985 कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय राज्यात 1 कोटी 77 लाख कोरोना चाचण्या झाल्या आहेत. बिहारमध्ये कोरोनाला रोखण्यासाठी कडक नियम लागू करण्यात आले आहेत. 

loading image