क्रिकेटमध्ये दलितांना हवे आरक्षण- आठवले

वृत्तसंस्था
बुधवार, 4 जानेवारी 2017

लितांना राष्ट्रीय क्रिकेट संघासह सर्व खेळांमध्ये आरक्षण मिळावे. दक्षिण आफ्रिका संघामध्ये कृष्णवर्णीयांना ज्याप्रमाणे तेथील सरकारने आरक्षण जाहीर केलेले आहे.

नवी दिल्ली - भारताच्या क्रिकेट संघासह सर्व खेळांच्या राष्ट्रीय संघांमध्ये दलितांना आरक्षण मिळावे, अशी सूचना केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

भाजप खासदार उदीत राज यांनी सर्व खेळांमध्ये दलितांना आरक्षण मिळावे, अशी मागणी केली होती. आठवले यांनी राज यांच्या मागणीला पाठिंबा दिला. आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना आर्थिक स्थैर्यासाठी जमीन किंवा पाच लाख रुपयांची मदत करावी आणि विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ द्यावे अशी मागणी केली आहे.

आठवलेंना राज यांना पाठिंबा देत म्हटले, की दलितांना राष्ट्रीय क्रिकेट संघासह सर्व खेळांमध्ये आरक्षण मिळावे. दक्षिण आफ्रिका संघामध्ये कृष्णवर्णीयांना ज्याप्रमाणे तेथील सरकारने आरक्षण जाहीर केलेले आहे. तसेच आपल्याकडेही व्हावे. या निर्णयामुळे दलित समुदायातील प्रतिभावान खेळाडूंना संधी मिळेल.

Web Title: Union minister bats for quota in Indian cricket team