
रात्री गोंडवाना एक्सप्रेस ट्रेनमध्ये बसलेले केंद्रीय मंत्री जुएल उरांव हे दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रेनमधून बेपत्ता होते. ते अचानक गायब झाल्यानं खळबळ उडाली होती. जेव्हा त्यांचा शोध घेण्यात आला तेव्हा ते दुसऱ्याच एक्सप्रेसमध्ये जखमी अवस्थेत आढळून आले. त्यांच्या हाता पायला दुखापत झाली होती. केंद्रीय मंत्री जुएल उरांव हे दिल्लीहून जबलपूरला जात होते. शनिवारी रात्री ते गोंडवाना एक्सप्रेसमध्ये बसले. पण दुसऱ्या दिवशी सकाळी ते संपर्क क्रांती एक्सप्रेसमध्ये सापडले. ते बेपत्ता झाल्याची माहिती समोर येताच खळबळ उडाली होती. ३ तासांच्या शोधमोहिमेनंतर ते जखमी अवस्थेत सापडले.