जो घर सांभाळू शकत नाही; तो देश सांभाळू शकत नाही- गडकरी

जो घर सांभाळू शकत नाही; तो देश सांभाळू शकत नाही- गडकरी

नागपूर- मला खूप लोक भेटतात. मला माझं आयुष्य भारतीय जनता पक्षाला द्यायचं आहे, असे सांगतात. मी त्यांना पहिल्यांदा घर सांभाळण्याचा सल्ला देत असतो, असे स्पष्ट मत केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक केले आहे. जो आपलं स्वतःचे घर, मुलं कुटुंब सांभाळू शकत नाही तो देश सांभाळू शकत नाही, असे परखड मत गडकरी यांनी नागपूरमधील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत असताना व्यक्त केले.

नागपूर येथे अभाविपच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी पक्षाचं काम करण्यास उत्सुक असणाऱ्या कार्यकर्त्यांचे गडकरींनी कान टोचले. गडकरी म्हणाले, जो आपलं घर सांभाळू शकत नाही तो देश सांभाळू शकत नाही. भाजपठी, देशासाठी आपलं आयुष्य देण्यास तयार असणारे खूप लोक आपल्याला भेटत असतात. त्यांनी आधी आपलं घर सांभाळावं, मग पक्षासाठी, देशासाठी वेळ द्यावा, असेही गडकरी यावेळी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com