गडकरींनी मोदींना लगावला अप्रत्यक्ष टोला

वृत्तसंस्था
शनिवार, 22 डिसेंबर 2018

पुणे : लोकसभा निवडणुकीत पराभव झालेल्या उमेदवाराला जेव्हा विचारतो का हरलास तेव्हा तो 'फ्लेक्स लावण्यास पक्षाने पैसे दिले नाही', असे कारण देतो. पण माझे म्हणणे आहे. की यशाप्रमाणेच अपयशाची जबाबदारी घ्यायला नेतृत्वाने शिकले पाहिजे. या विधानातून गडकरींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच अप्रत्यक्षपणे टोला लगावला. तसेच यशाचे अनेक बाप असतात. पण अपयश अनाथ असते, असेही ते म्हणाले.

पुण्यातील एका जाहीर कार्यक्रमात गडकरी बोलत होते. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत पराभूत उमेदवाराला जेव्हा आपण त्याला पराभवाचे कारण विचारतो तेव्हा 'फ्लेक्स लावण्यास पक्षाने पैसे दिले नाही' असे कारण दिले जाते. मात्र, माझे म्हणणे आहे, की यशाप्रमाणेच अपयशाची जबाबदारीही घ्यायला नेतृत्वाने शिकले पाहिजे. तसेच यशाचे अनेक बाप असतात. पण अपयश अनाथ असते. यशाप्रमाणे अपयशाची जबाबदारीही नेतृत्वाने घ्यायला शिकले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.  

दरम्यान, जी व्यक्ती चांगले काम करते, अशा लोकांच्या मागे सरकारने उभे राहिले पाहिजे. मग तो कोणत्याही पक्षाचा असो. तर वाईट काम करणारा आपल्या पक्षाचा जरी असला तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, असेही गडकरी म्हणाले.

Web Title: Union Minister Nitin Gadkari Indirectly Criticizes Narendra Modi