मुंबईकरांनो, तुम्हांला मिळतंय पिण्याचं शुद्ध पाणी; राजधानी तळालाच!

वृत्तसंस्था
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

हवेच्या प्रदूषणाला तोंड देणाऱ्या दिल्लीकरांना मात्र सर्वांत अशुद्ध पाणी मिळत आहे. यादीत दिल्लीचे स्थान तळात आहे. हवा आणि पाणी अशा दुहेरी प्रदूषणाने दिल्लीची कोंडी झाली आहे.

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतील हवेचा दर्जा अत्यंत खालावलेला असतानाच येथे प्रदूषित पाण्याचीही गंभीर समस्या आहे. शुद्धतेच्या तपासणीत या महानगरातील पिण्याचे पाणी देशातील सर्वांत खराब पाणी असल्याचे निदर्शनास आले आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील पाणी मात्र सर्वांत शुद्ध असल्याचे निदर्शनास आले आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

केंद्रीय ग्राहक, अन्नपुरवठा व सार्वजनिक वितरणमंत्री रामविलास पासवान यांनी शनिवारी (ता.16) पत्रकार परिषदेत देशातील 21 मोठ्या शहरांमधील शुद्ध पाण्याची क्रमवारी जाहीर केली. दिल्लीसह देशातील 20 राज्यांमधील पाण्याचे नमुने यासाठी तपासण्यात आले. क्रमवारीत मुंबई अव्वल आहे. सर्व प्रकारच्या कसोट्यांवर मुंबापुरीतील पाणी शुद्ध असल्याचे सिद्ध झाले.

- जावाची 'पेरॅक' बॉबर भारतात लाँच, फोटो पाहाच!

हवेच्या प्रदूषणाला तोंड देणाऱ्या दिल्लीकरांना मात्र सर्वांत अशुद्ध पाणी मिळत आहे. यादीत दिल्लीचे स्थान तळात आहे. हवा आणि पाणी अशा दुहेरी प्रदूषणाने दिल्लीची कोंडी झाली आहे. दहा चाचण्यांच्या आधारे सरकारने पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी केली. यात हैदराबादने दुसरा तर भुवनेश्‍वरने तिसरा क्रमांक मिळविला. 

- तुमच्या दर महिन्याच्या पगाराबद्दल मोठी बातमी...

शुद्ध पाण्यानुसार क्रमवारी 

1) मुंबई, 2) हैदराबाद, 3) भुवनेश्‍वर, 4) रांची, 5) रायपूर, 6) अमरावती, 7) सिमला, 8) चंडीगड, 9) त्रिवेंद्रम, 10) पाटणा, 11) भोपाळ, 12) गुवाहाटी, 13) बंगळूर, 14) गांधीनगर, 15) लखनौ, 16) जम्मू, 17) जयपूर, 18) डेहराडून, 19) चेन्नई, 20) कोलकता, 21) दिल्ली. 

तीन महानगरांची स्थिती वाईट 

देशातील मुंबईसह चार महानगरांपैकी दिल्ली, कोलकता आणि चेन्नईत पाण्याचा दर्जा खालावलेला आहे. या तिन्ही शहरांचा क्रमांक अनुक्रमे 19, 20 आणि 21 वा आहे. 'स्मार्ट' व आधुनिकतेच्या शर्यतीत ही शहरे तेथील रहिवाशांना मूलभूत सुविधाही पुरवू शकत नाहीत, हे लक्षात येते. 

'भारतीय मानक ब्युरो'(बीएसआय)च्या मदतीने हे सर्वेक्षण केले आहे. देशात प्रदूषण आणि पिण्याचे पाणी या दोन मोठ्या समस्या आहेत. माझ्याकडे जोपर्यंत मंत्रालय आहे, तोपर्यंत नागरिकांना स्वच्छ पाणी पुरविण्याची व्यवस्था केली जाईल. ज्या राज्याला सरकारी मदत हवी असेल, ती त्यांना देण्यात येईल. 
- रामविलास पासवान, केंद्रीय ग्राहक व अन्नपुरवठामंत्री 

- 'मिर्झापूर 2' च्या निमित्ताने कालिन भय्याचं इन्स्टाग्रामवर कमबॅक ! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Union Minister Ram Vilas Paswan declared Mumbai tops in quality of tap water