सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांना जागेवरच गोळ्या घाला : केंद्रीय मंत्री

वृत्तसंस्था
बुधवार, 18 डिसेंबर 2019

'सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांना जागीच गोळी घातली पाहिजे. रेल्वेचे नुकसान करणाऱ्यांनाही जागेवर गोळी घालून मारले पाहिजे,' असे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय मंत्री सुरेश अनगडी यांनी केले आहे.

कोलकाता : 'सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांना जागीच गोळी घातली पाहिजे. रेल्वेचे नुकसान करणाऱ्यांनाही जागेवर गोळी घालून मारले पाहिजे,' असे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय मंत्री सुरेश अनगडी यांनी केले आहे. पश्चिम बंगाल व ईशान्येकडील राज्यात नागरिकत्व दुसरूस्ती विधेयकावरून प्रचंड हिंसाचार झाला. पार्श्वभूमीवर त्यांना असे वक्तव्य केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नागरिकत्त्व दुरूस्ती कायद्याच्या विरोधात पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. यात सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान करण्यात आले, तसेच रेल्वेंची तोडफोड करण्यात आली. यामुळे जे लोक सार्वजनिक मालमत्तांची तोडफोड करतात, त्यांना जागेवरच गोळी घाला असे आदेश मी जिल्हाधिकारी व प्रशासनाला दिले आहेत, असे अनगडी यांनी सांगितले. 

विद्यार्थी आंदोलनावरून पुलकित भडकला; निर्मात्याला म्हणाला 'पुन्हा भेटूही नका'

रेल्वे नुकसानीचा सामना करत आहे, असा प्रश्न माध्यमांनी विचारल्यावर त्यांनी उत्तर दिले की, देशात काहीही झाले, तरी प्रथम सार्वजनिक मालमत्तेवर, त्यातल्या त्यात रेल्वेची लगेच तोडफोड केली जाते. त्यामुळे रेल्वे सर्वाधिक नुकसानीत जाते. त्यांनी यावेळी विरोधकांवरही निशाणा साधला. ते म्हणाले, विरोधक अशाप्रकारच्या देशविरोधी गोष्टींना समर्थन देतात, त्यामुळे आंदोलक हुसकावले जातात व तोडफोड करतात. नवीन आलेला कायदा हा कोणत्याही नागरिकासाठी त्रासदायक नाही. सर्वांनी हा गैरसमज दूर करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Union Minister Suresh Angadi gives controversial statement