
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं राज्यांना पत्र लिहिलं आहे, काय लिहलंय या पत्रात?
कोरोना वाढतोय, केंद्राचा पत्रातून राज्यांना इशारा
देशात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असल्याचे चित्र दिसत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे हा वाढता आलेख नागरिकांच्या चिंतेत भर घालत आहे. मागील काही दिवसांपासून अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग आणि पॉझिटिव्ह रेटमध्ये वाढ होताना दिसत आहे. यासंदर्भात आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं राज्यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये राज्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची खबरदारी घेण्यास सांगण्यात आलं आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मिझोराम या राज्यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात लिहलंय की, राज्यांनी कोरोनाबाबत आवश्यक ते निर्णय घ्यावेत. सतत वाढणाऱ्या कोरोना सकारात्मकतेच्या दराचा उल्लेखही या पत्रात करण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर चिंता व्यक्त करत आरोग्य मंत्रालयाने याबाबत आवश्यक पाऊलं उचलण्याचा आणि ठराविक राज्यांना सतर्क राहण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा: मुंबईतील मशिदीवरच्या भोंग्याचा आवाज झाला कमी
मागील काही आठवड्यांपासून देशातील कोरोना संसर्गात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. विशेष म्हणजे दिल्ली, हरियाणा, गुजरात आणि इतर राज्यांत कोरोना रुग्ण झपाट्याने पाहायला मिळत आहे. कोरोना संसर्ग वाढल्यामुळे याआधीही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांना पत्र लिहित, आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या पत्रामध्ये कोरोना निर्बंध लागू करण्याच्या तसेच लसीकरावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दिल्लीमध्ये कोरोनाचा आलेख वाढताच असल्याचा चित्र पहायला मिळत आहेत. देशाची राजधानी दिल्लीमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचे 600 हून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे तिथला कोरोना रुग्ण सकारात्मकता दर 7 टक्क्यांच्या वर पोहोचला आहे. मागील चार आठवड्यांपासून दिल्लीमध्ये सातत्याने रुग्ण वाढत आहेत. मात्र घाबरुन न जाता नागरिकांना थबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
हेही वाचा: राज्यात लोडशेडींग असणार का? ऊर्जामंत्र्यांनी दिलं उत्तर
Web Title: Union Secretary Rajesh Bhushan Writes A Letter To State For Corona Positivity Rate Increased
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..