८ तारखेला कामगारांचा देशव्यापी संप; कोण-कोण होणार सहभागी?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 January 2020

केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या विरोधात ८ जानेवारी २०२० रोजी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने देशव्यापी संपाची हाक देण्यात आली असून विशेष म्हणजे या संपाला शिवसेनेकडूनही समर्थन करण्यात आले आहे. शिवसेनेकडून समर्थन करण्यात आल्याने आता शिवसेना डाव्यांच्या या संपामध्ये सहभागी होणार असल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या संपाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत उपस्थिती लावली होती.

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या विरोधात ८ जानेवारी २०२० रोजी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने देशव्यापी संपाची हाक देण्यात आली असून विशेष म्हणजे या संपाला शिवसेनेकडूनही समर्थन करण्यात आले आहे. शिवसेनेकडून समर्थन करण्यात आल्याने आता शिवसेना डाव्यांच्या या संपामध्ये सहभागी होणार असल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या संपाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत उपस्थिती लावली होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले, 'मोदी सरकार देशातील जनतेला २ कोटी नोकऱ्या देणार होते. मात्र, प्रत्यक्षात ५ कोटी नोकऱ्या गेल्या आहेत. रुपया डॉलरच्या तुलनेत मजबूत करणार होते पण १ लाख ६७ हजार कोटी रुपये रिझर्व्ह बँकेकडून ओरबाडले गेले.'

केवळ मुख्यमंत्रिपदासाठी सेनेने भगव्याशी तडजोड केली : गडकरी

कामगार संघटना संयुक्त कृती समिती आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांची आज (ता.०३) शुक्रवारी मुंबई पत्रकार संघात संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांसोबत राऊत उपस्थित होते. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापनेनंतर आता डाव्या पक्षांसोबत देशव्यापी संपात शिवसेना सहभागी होणार आहे.

धनंजय मुंडेची जागा रिक्त; 'या' नेत्याला मिळणार संधी

कोण-कोण होणार सहभागी?
या देशव्यापी संपात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी या राजकीय पक्षांच्या संलग्न कामगार संघटना तसेच सेन्ट्रल स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉई फेडरेशन, सर्व बँका, एलआयसी, जीआयसी, पोर्टट्रस्ट, डिफेन्स, सिव्हिल एव्हिएशन, बीएसएनएल, एमटीएनएल, बीपीसीएल आणि एचपीसीएल या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्याच्या कामगार संघटनाही सहभागी होणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unions to go ahead with nationwide strike on 8 Jan