BSF News : सीमाभिंतीवरील कुंपणावर मधुमक्षिकापालन! ‘बीएसएफ’चा अनोखा उपक्रम

BSF News
BSF Newsesakal

नवी दिल्ली : सीमा सुरक्षा दलाकडून (बीएसएफ) भारत आणि बांगलादेश यांच्यातील सीमाभिंतीवर मधमाश्या पाळण्यात येणार असून, यामुळे जनावरांच्या तस्करीसाठी कुंपणावरील झुडपे कापणे तसेच इतर गुन्ह्यांना आळा बसणार असल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळण्यासही मदत होणार आहे.

पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात बीएसएफच्या ३२ व्या बटालियनकडून या अनोख्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. अशाप्रकारे राबविला जाणारा हा पहिला उपक्रम असल्याचेही सांगण्यात आले.

BSF News
Diwali 2023 : जातीभेदाच्या पलिकडे! हिंदू-मुस्लिम समाज एकत्र येऊन साजरा करतो दिवाळी, अनेक वर्षांची आहे परंपरा!

सीमेची सुरक्षा आणि मधुमक्षिकापालनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणे, हा यामागचा उद्देश आहे, असा बीएसएफच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

या उपक्रमासाठी बीएसएफकडून आयुष मंत्रालयालाही सहभागी करून घेण्यात आले आहे. मंत्रालयाकडून यासाठी मधमाश्यांचा पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच, सीमेवरील कुंपणावर त्यांना बसवण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये शिकवली जाणार आहे.

सीमाभिंतीवरील कुंपणावर मधमक्षिकापालन करण्याच्या उपक्रमाची सुरुवात नुकतीच करण्यात आली असून, मधुमक्षिकापालन करणाऱ्या शेतकऱ्यांना यासाठीच्या पेट्या सुकरपणे मिळतील, याची काळजी बीएसएफकडून घेण्यात येईल. या उपक्रमाला स्थानिक शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- सुजीतकुमार, कमांडंट, बीएसएफ, ३२ वी तुकडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com