PM Modi to Skip UNGA 80th Session
esakal
Prime Minister Narendra Modi will not attend the 80th United Nations General Assembly session : सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस संयुक्त राष्ट्र महासभेच्या 80वं सत्र पार पडणार आहे. मात्र, त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला जाणार नसल्याचं पुढं आले आहे. त्यांच्या जागी परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. यापूर्वी पंतप्रधान मोदी 26 सप्टेंबर रोजी सभेला संबोधित करणार असल्याचे सांगण्यात आलं होतं. मात्र, संयुक्त राष्ट्राने शुक्रवारी जाहीर केलेल्या सुधारित यादीत पंतप्रधान मोदींऐवजी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचं नाव आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी अमेरिकेला जाणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.