

LPU Case: Students Allege Pressure From University Administration
Esakal
पंजाबमधील फगवाडा येथील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (LPU) परिसरात विद्यार्थिनीवर बलात्काराच्या आरोपानंतर आंदोलनाला हिंसक वळण लागलं. यात मोट्या प्रमाणावर जाळपोळ आणि तोडफोड झाली. दरम्यान, हिंसक आंदोलनाला आता नवे वळण लागले आहे. युनिव्हर्सिटीकडून विद्यार्थीनीवर बलात्काराचे आरोप फेटाळले आहेत. तर दुसरीकडे व्हिडीओतील विद्यार्थीनींनी प्रशासनाने आपल्याला काय बोलायचे हे सांगितले होते आणि परवानगी न घेता व्हिडिओ एडिट करून सोशल मीडियावर टाकल्याचे म्हटलंय.