Unlock 5: शाळा ते सिनेमागृहापर्यंत, 15 ऑक्टोंबरपासून काय होईल सुरु?

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 14 October 2020

15 ऑक्टोंबरपासून कंटेंमेंट झोन बाहेरील शाळा, सिनेमागृहे, स्विमिंग पूल, मल्टिप्लेक्स, इंटरटेनमेंट पार्क सुरु केले जाणार आहेत

नवी दिल्ली- केंद्र सरकारने अनलॉक-5 साठी गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. 15 ऑक्टोंबरपासून कंटेंमेंट झोन बाहेरील शाळा, सिनेमागृहे, स्विमिंग पूल, मल्टिप्लेक्स, इंटरटेनमेंट पार्क सुरु केले जाणार आहेत. पण, यावेळी नागरिकांना कोरोनासंबंधी सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहेत. 3 ऑक्टोंबर रोजी केंद्र सरकारने लॉकडाऊनमधून आणखी काही सवलती दिल्या आहेत.

केंद्र सरकारने अनेक निर्बंध उठवले असले तरी शाळा उघडण्याबाबत राज्य सरकारला अंतिम अधिकार देण्यात आले आहेत. शाळा सुरु करायचे किंवा नाही याबाबत राज्य सरकार निर्णय घेऊ शकते. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने अनेक राज्यांनी शाळा न उघडण्याचा निर्णय घेतला आहे.  

अमृता फडणवीसांच्या 'Dicey Creature'ला रुपाली चाकणकरांचं प्रत्युत्तर;...

सिनेमागृहे/ मल्टिप्लेक्स

नवीन गाईडलाईन्सनुसार, सिनेमागृहे, मल्टिप्लेक्स 50 टक्के क्षमतेने उघडण्याची मुभा देण्यात आली आहे. सिनेमागृहात प्रत्येक प्रेक्षकांमध्ये 6 फुटांचे अंतर असणे आवश्यक असणार आहे.  शिवाय शारीरिक अंतराचे पालन करणे, मास्क घालणे आणि सॅनिटर उपलब्ध करुन देणे बंधनकारक आहे. सिनेमागृहात पॅकेज केलेले फूडच आणता येणार आहे. 

इंटरटेनमेंट पार्क

इंटरटेनमेंट पार्क, थीम पार्क सुरु केले जाणार आहेत. पण, याआधी जागेचे सॅनिटायझेशन करावे लागणार आहे. तसेच सॅनिटायझेशन दररोज करणे आवश्यक आहे. सर्वांना कोरोनासंबंधी नियमांचे पालन करणे बंधनकारण आहे. स्वच्छता आणि स्पर्श होण्याच्या जागेचे सॅनिटायझेशन वेळोवेळी करावे लागेल. इंटरटेनमेंट पार्कमधील स्विमिंग पूल बंदच असणार आहेत. 

राज्यपाल VS राज्य सरकार वाद पेटणार? वाद राष्ट्रपती दरबारी जाण्याची शक्यता

स्विमिंग पूल

क्रिडा मंत्रालयाने जाहीर केल्यानुसार ऑलिम्पिक साईजच्या स्विमिंगपुलमध्ये केवळ 20 जणांनाच परवानगी असणार आहे. शिवाय प्रत्येक पोहोणाऱ्याला सेल्फ डिकलेरेशन प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे.

शाळा, कॉलेज

दिल्ली आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी शाळा सुरु न करण्याचा निर्णय घेतला आहे. तर पंजाब आणि उत्तर प्रदेश सरकारांनी अनुक्रमे 15 आणि 18 ऑक्टोंबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या गाईडलाईन्सनुसार, शाळांना पालकांकडून लिखित परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच शिफ्टमध्ये शाळा भरवावी लागणार आहे. विद्यार्थ्यांची उपस्थिती लवचिक करण्यात येणार असून तीन आठवड्यांपर्यंत असाईंमेंट देण्यास मनाई करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unlock 5 From reopening of schools to cinema halls here a list of relaxations from Oct 15