esakal | राज्यपाल VS राज्य सरकार वाद पेटणार? वाद राष्ट्रपती दरबारी जाण्याची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यपाल VS राज्य सरकार वाद पेटणार? वाद राष्ट्रपती दरबारी जाण्याची शक्यता

राज्यपाल आणि मुख्यमंत्री असा चांगलाच वाद रंगला आहे. दरम्यान राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार सुरु असलेला वाद राष्ट्रपती दरबारी जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यपाल राष्ट्रपतींकडे राज्याचा कारभार हाती घ्यावा अशी शिफारस करण्याची शक्यता आहे. 

राज्यपाल VS राज्य सरकार वाद पेटणार? वाद राष्ट्रपती दरबारी जाण्याची शक्यता

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः मंगळवारी राज्यातील बंद मंदिरावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं. या पत्रात त्यांनी मुख्यमंत्र्यांना अनेक प्रश्न उपस्थित केले. त्या पत्राला मुख्यमंत्र्यांनीही उत्तर दिलं. त्यानंतर राज्यपाल आणि मुख्यमंत्री असा चांगलाच वाद रंगला आहे. दरम्यान राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार सुरु असलेला वाद राष्ट्रपती दरबारी जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यपाल राष्ट्रपतींकडे राज्याचा कारभार हाती घ्यावा अशी शिफारस करण्याची शक्यता आहे. 

राज्यपालांकडे घटनात्मक अधिकार असतात. या अधिकारानुसार राज्यपाल मुख्यमंत्र्यांकडे उत्तरं मागू शकतात, ज्याची समाधानकारक उत्तरं देणं मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य असते. त्यामुळे राज्यपाल राष्ट्रपतींना सांगू शकतात की, राज्याशी संबंधित काही प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत. म्हणूनच राज्यातील राजकीय परिस्थिती ही आलबेल नाही. यामुळेच राष्ट्रपतींनी राज्याचा कारभार हाती घ्यावा, अशी शिफारस राज्यपाल करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

राज्यपाल राष्ट्रपती कार्यलयात दर महिन्याला राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन त्यासंदर्भातला अहवाल पाठवत असतात. त्यातच राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना राज्यात बंद असलेल्या मंदिरांच्या मुद्द्यावरुन पत्र लिहिलं. त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तरं दिलं. त्यावरुन चांगलाच वाद रंगला आहे. त्यामुळे या वादामुळे राज्यातल्या सद्य परिस्थितीबाबत राज्यपाल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना अहवाल पाठवू शकता. 

अधिक वाचाः  बीएमसी आयुक्त आणि महापौरांमध्ये खडाजंगी; आयुक्तांच्या माफीनंतर वादावर पडदा

पत्रात काय म्हणाले होते राज्यपाल? 

बार-रेस्टॉरंट सुरु झाले, देवच कुलुप बंद का? तुम्हाला हिंदुत्त्वाचा विसर पडला का? मंदिरं सुरु करु नये असे दैवी संकेत मिळतात का?" असे सवाल राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात उपस्थित केला होता. तसंच राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना  हिंदुत्त्वाची आठवणही करुन दिली.

या पत्रात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना मंदिरं सुरु करण्याबद्दल सूचना केली होती. ठाकरे, तुम्ही कट्टर हिंदुत्व विचारांचे आहात. तुम्ही अयोध्या राम मंदिरला गेला होता. मुख्यमंत्री झाल्यावर आषाढी एकादशी पंढरपूर येथे पूजा केली, अशी आठवण देखील मुख्यमंत्र्यांना करुन द्यायला राज्यपाल विसरले नाहीत.  तुम्ही 11 ऑक्टोबर कोरोना संदर्भात संबोधित करताना मंदिर तुर्तास खुले करणे कठीण सांगितले आहे. काही शिष्टमंडळं मंदिर खुले करावे यासाठी भेटले. त्यामुळे हा पत्रव्यवहार करत असल्याचेही राज्यपाल यांनी सांगितले.

हेही वाचाः  मंदिरे उघडण्याच्या मुद्यावरून अमृता फडणवीस यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुख्यमंत्र्यांनी दिलं पत्राला उत्तर 

माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही' असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या पत्राला सणसणीत उत्तर दिलं.

Governor Bhagat Singh Koshyari And Chief Minister letter war Will presidents court