त्रिपुराबाबतच्या फेक न्यूजमुळं अमरावतीत हिंसाचार - केंद्रीय गृह मंत्रालय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

त्रिपुराबाबतच्या फेक न्यूजमुळं अमरावतीत हिंसाचार - केंद्रीय गृह मंत्रालय

त्रिपुराबाबतच्या फेक न्यूजमुळं अमरावतीत हिंसाचार - केंद्रीय गृह मंत्रालय

नवी दिल्ली : त्रिपुरा येथील हिंसात्मक घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी काल शुक्रवारी मुस्लिम समाजाकडून मोर्चा काढण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली होती. या घटनाक्रमाला हिंसक वळण लागल्याचं पहायला मिळालं होतं. त्याच्या निषेधार्थ काल शनिवारी भाजपने शहर बंदचं आवाहन केलं होतं. या बंदला हिसंक वळण लागलं होतं. त्यानंतर परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अमरावतीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली तसेच इंटरनेट देखील बंद करण्यात आलं.

हेही वाचा: सरन्यायाधीशांच्या प्रतिक्रियेवर सॉलिसिटर जनरल म्हणाले, 'Same Here'

या साऱ्या प्रकारावर आता केंद्रीय गृहमंत्रालयाने आपलं मत मांडलं आहे. गृहमंत्रालयाने म्हटलंय की, त्रिपुराबाबतच्या अफवेमुळे ही घटना घडली आहे. लोकांनी कोणत्याही परिस्थिती शांतता राखावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे. त्रिपुराबाबतच्या अफवेमुळे तसेच बेताल वक्तव्यांमुळे महाराष्ट्रातील शांतात बिघडली आणि काही हिंसक घटना घडल्याचं दिसून आलं. ही खूपच चिंताजनक बाब असून कोणत्याही परिस्थितीत शांतता राखण्याचं आवाहन केंद्रीय गृहमंत्रालयाने केलं आहे.

त्रिपुरामधील गोमती जिल्ह्यातील मशिदीमध्ये नासधुस केल्याची अफवा सोशल मीडियात पसरली आहे. वास्तव असं नसून ही अफवा आहे. लोकांनी शांतता राखावी तसेच अशा प्रकारच्या चुकीच्या माहितीला बळी पडू नये, असंही गृहमंत्रालयाने म्हटलंय. गेल्या काही दिवसांमध्ये त्रिपुरातील मशिदीमध्ये याप्रकारची नासधुस घडली नसल्याचंही गृहमंत्रालयाने स्पष्ट केलंय. सोशल मीडियातील पोस्टमध्ये दावा केल्याप्रमाणे कसल्याही प्रकारची नासधुस, बलात्कार, मृत्यू अथवा कुणालाही जखमी करण्याची घटना त्रिपुरात घडलेली नाहीये.

हेही वाचा: भाजपच्या 'अमरावती बंद'ला हिंसक वळण; जमावाकडून गाड्यांची तोडफोड

नेमकं काय घडलं?

त्रिपुरामध्ये मशिदीत तोडफोड झाल्याची अफवा पसरल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी मोर्चे काढण्यात आले. मालेगाव, नांदेड आणि अमरावतीमधील मोर्चाला हिंसक वळण लागलं. त्याच्या निषेधार्थ भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी काल शनिवारी अमरावती बंदची हाक दिली. त्या बंदला देखील हिंसक वळण लागल्याचं दिसून आलं. यामध्ये काही गाड्यांची तोडफोड झाल्याचं दिसून आलं. जे रस्त्यात दिसत आहे त्याला बंद करा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली. जय श्रीरामच्या घोषणा आंदोलकांकडून देण्यात आल्या.

loading image
go to top