भरधाव ट्रकने ३ गाड्यांना धडक दिली, बोलेरो पेटून ६ जण जिवंत जळाले; ११ भाविकांचा मृत्यू

Uttar Pradesh Accident News उत्तर प्रदेशात भरधाव ट्रकने धडक दिल्यानं झालेल्या भीषण अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रकने बोलेरो, कार आणि एका कंटेनरला मागून धडक दिली. त्यानंतर बोलेरो पेटून दुर्घटना घडली.
Major Road Accident in UP Vehicles Collide Fire Breaks Out

Major Road Accident in UP Vehicles Collide Fire Breaks Out

Esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील मिर्झापूर इथं एका ट्रकने बोलेरो, कार आणि कंटेनरला धडक दिल्यानं भीषण अपघात झालाय. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झालाय. ट्रकच्या धडकेनंतर बोलेरोला भीषण आग लागली. बोलेरोतील प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. यातील ६ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर इतर ५ जणांचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. हे सर्व भाविक मैहर देवीचे दर्शन घेऊन प्रयागराजला परतत होते. घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून प्रशासनाला तातडीने मदत आणि चौकशीचे आदेश दिले आहेत. Speeding Truck Causes Fatal Accident Several Dead

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com