esakal | 'आर्थिक संकटात होतो तेव्हा...' ; राजपाल यादवने सांगितल्या आठवणी
sakal

बोलून बातमी शोधा

rajpal yadav

'आर्थिक संकटात होतो तेव्हा...' ; राजपाल यादवने सांगितल्या आठवणी

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते राजपाल यादव (rajpal yadav) यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्यांच्यावर आलेल्या आर्थिक संकटाबद्दल सांगितले. राजपाल यांनी 5 करोड रूपयांचे कर्ज घेतले होते. ते कर्ज त्यांनी फेडले नसल्याने 2018 मध्ये त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. राजपाल यांना त्यावेळी तिन महिन्यांचा तुरूंगवास भोगावा लागला होता. त्यावेळी बॉलिवूडमधील त्यांच्या मित्रांनी त्यांना मदत केली होती. यासर्व आठवणी त्यांनी आर जे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितल्या आहेत. (actor rajpal yadav recall his struggle days during financial crisis pvk99)

मुलाखतीमध्ये राजपाल यांनी सांगितले, 'जेव्हा मी आर्थिक संकटाचा सामना करत होतो तेव्हा, मी मुंबईच्या रस्त्यावर चालत काम शोधायला जात होतो. कारण माझ्याकडे रिक्षा किंवा बससाठी पैसे नव्हते. अनेक लोकांनी मला त्यावेळी मदत केली होती. बॉलिवूडमधील काही हितचिंतकांनी देखील मला मदत केली. त्यांनी जर मला त्यावेळी मदत केली नसती तर मी आज इथे नसतो. संपूर्ण जग तेव्हा माझ्याबरोबर होते. मला जेवढ्या मदतीची गरज होती तेवढी मदत मला तेव्हा मिळाली.'

हेही वाचा: HBD'देसी गर्ल'; प्रियांका आहे इतक्या कोटींची मालकीण, जाणून घ्या खास गोष्टी

चित्रपटसृष्टीतील सुरूवातीच्या काळाबद्दल राजपाल यांनी सांगितले, 'जेव्हा मी मुंबईला अभिनय क्षेत्रात करियर करण्यासाठी आलो होतो. तेव्हा मला या शहराबद्दल काहीच माहित नव्हते. मी तेव्हा शेअर रिक्षामधून बोरिवली येथे जात होतो. माझ्याकडे जेव्हा रिक्षासाठी पैसे नसायचे तेव्हा मी चालत जात होतो.' लवकरच राजपाल यादव हे 'हंगामा-2' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या चित्रपटात परेश रावल, शिल्पा शेट्टी आणि मीझान हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

हेही वाचा: Video: भूमी पेडणेकरचा फिटनेस फंडा; न थांबता चढते ९५० पायऱ्या

loading image