ममता यूपीमध्ये थेट मैदानात नाहीत; सर्व जागा दिल्या अखिलेश यांना

mamata banerjee
mamata banerjeee sakal

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधानसभेच्या निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरण्यासाठी उत्सुक नसल्याची माहिती समाजवादी पक्षाचे नेते किरणमोय नंदा यांनी दिली आहे. नंदा हे बंगालचे माजी मंत्री होत आणि जे सध्या अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचे उपाध्यक्ष आहेत. त्यांनी म्हटलंय की, ममता बॅनर्जी 8 फेब्रुवारी रोजी लखनौ आणि वाराणसी येथे होणार्‍या व्हर्च्यूअल पत्रकार परिषदेसाठी यादव यांना भेटण्यासाठी राज्याला भेट देतील.

mamata banerjee
विशाल फटेला 10 दिवसांची पोलीस कोठडी!
mamata banerjee
धक्कादायक! नागपूरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

पुढे त्यांनी म्हटलंय की, तृणमूल काँग्रेस पक्ष आणि ममता बॅनर्जी या उत्तर प्रदेशमध्ये लढणार नाहीयेत. सर्व जागा या अखिलेश यादव यांना देण्यात आल्या असल्याचं नंदा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. अखिलेश यादव यांनी 2021 च्या निवडणुकीपूर्वी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या प्रचारासाठी समाजवादी पक्षाच्या राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांना पक्षाचे दूत म्हणून बंगालमध्ये तृणमूलच्या प्रचारासाठी पाठवले होते.

सध्या पश्चिम बंगाल राज्याच्या पल्याड जाण्याचा प्रयत्न तृणमूल करत आहे. त्यादृष्टीने इतर राज्यात आपला पाया मजबूत करण्याच्या प्रयत्नात तृणमूल काँग्रेसने गोवा राज्यांमध्ये आक्रमकपणे प्रचार केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com