निवडणुकीपूर्वीच भाजप, बसपाला मोठा धक्का; खासदार-आमदारांचा 'सपा'त प्रवेश

Uttar Pradesh Assembly Election
Uttar Pradesh Assembly Electionesakal
Summary

2009 मध्ये राकेश पांडे सायकल सोडून हत्तीवर स्वार झाले होते.

Uttar Pradesh Assembly Election : उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी (UP Assembly Election) पक्षांतराची मालिका सुरुच आहे. आता भारतीय जनता पक्षाच्या (Bharatiya Janata Party) आमदार माधुरी वर्मा (Madhuri Verma) आणि बहुजन समाज पक्षाचे (Bahujan Samaj Party) माजी खासदार राकेश पांडे (Rakesh Pandey) यांच्यासह इतर पक्षांच्या नेत्यांनी सोमवारी समाजवादी पक्षात प्रवेश केला.

लखनौमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देताना सपा (Samajwadi Party) अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) म्हणाले, मी माजी खासदार राकेश पांडे यांचं पक्षात स्वागत करतो. मला आनंद आहे, की आज त्यांच्यासोबत त्यांचे अनेक मित्र पक्षात सामील झाले आहेत. शिवाय, भाजप आमदार माधुरी वर्मा यांनी देखील आज सपामध्ये प्रवेश केलाय, त्यांचंही मनापासून स्वागत करतो, असं म्हणत त्यांनी दोघांच्या हातात पक्षाचा झेंडा दिला.

Uttar Pradesh Assembly Election
'महाविकास आघाडी सरकार पडेल, राणेंच्या रुपानं आणखी एक माणूस आलाय'

माधुरी वर्मा या बहराइच (Bahraich) जिल्ह्यातील नानपारा मतदारसंघातून (Nanpara Constituency) भाजपच्या विद्यमान आमदार आहेत, तर राकेश पांडे हे आंबेडकर नगर लोकसभा मतदारसंघातील बसपा खासदार रितेश पांडे यांचे वडील आहेत. रितेश हा लोकसभेतील बसप संसदीय पक्षाचा नेता आहे. तत्पूर्वी, सपानं सोशल मीडियावर राकेश पांडे यांच्यासोबत अखिलेशचा फोटो शेअर केला आणि म्हटलं, की राष्ट्रीय अध्यक्ष, बसपाचे ज्येष्ठ नेते आणि आंबेडकर नगरचे माजी खासदार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत राकेश पांडे त्यांच्या सहकाऱ्यांसह सपामध्ये सामील झाले, त्यांचं अभिनंदन असं नमूद केलं.

Uttar Pradesh Assembly Election
भाजप प्रदेशाध्यक्षांना 14 दिवसांची पोलिस कोठडी; 'हे' प्रकरण आलं अंगलट

2009 मध्ये राकेश पांडे सायकल सोडून हत्तीवर स्वार झाले होते. राकेश यांनी बसपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि लोकसभा गाठली. एवढंच नाही तर यानंतर राकेश यांची समाजवादी पक्षाशी पकड मजबूत झाली. हे पाहता बसपनं जलालपूरमधून त्यांच्या मुलाला तिकीट दिलं. जलालपूर मतदारसंघातून रितेश पांडे (Ritesh Pandey) विजयी होऊन आमदार झाले. यानंतर 2019 मध्ये मायावतींनी रितेशला लोकसभेचं तिकीट देऊन विजयी केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com