UP Election 2022 : जाणून घ्या, डिजिटल प्रचारात कोण कोणावर भारी

कोरोनामुळे सर्व राजकीय पक्षांना 15 जानेवारीपर्यंत प्रचार सभा, रॅली, रोड शोंवर बंदी घातली आहे.
Political Party
Political PartySakal

नवी दिल्ली : कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना 15 जानेवारीपर्यंत मैदानांवरील प्रचार सभा, रॅली, रोड शो आदी करण्यावर बंदी घातली आहे, (Rally, Road Show Ban In UP ) त्यामुळे आगामी विधानसभेच्या तोंडावर उत्तर प्रदेशातील अनेक राजकीय पक्षांनी डिजिटल (Digital Campaigning ) प्रचाराची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, युपीमध्ये डिजिटल निवडणूक प्रचारात भाजपची तयारी इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत जोरदार असल्याचे दिसून येत आहे. (UP Assembly Election 2022 )

भाजपचे डिजिटल नियोजन काय ?

यूपीमध्ये भाजप मुख्यालयात (BJP War Room In UP) वॉर रूम तयार असून सोशल मीडियावर 6,500 लोकांची टीम आहे. तर, भाजपच्या 1918 प्रभागात सुमारे 5,700 पदाधिकारी आहेत. एवढेच नाही तर, प्रत्येक प्रभागाचा व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप (Whats App Group) तयार करण्यात आला आहे. (BJP's Digital Planning) भाजपच्या मुख्यालयातून डिजिटल प्रचार (Digital Campaigning ) साहित्य तयार केले जाणार असून, भाजप राज्यभर डिजिटल प्रचारासाठी 9 लाख एलईडी स्क्रीन बसवणार आहे. यासाठी 4 हायटेक स्टुडिओ तयार आहेत. या डिजिटल स्टुडिओमधून व्हर्च्युअल रॅली काढण्यात येणार असून, या रॅलीमध्ये एकाच वेळी 10-50 हजार लोक जोडले जाऊ शकतात.

भाजपचे प्रवक्ते राकेश त्रिपाठी (BJP spokesperson Rakesh Tripathi) म्हणाले, "आम्ही कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर काम करायला सुरुवात केली, आमच्याकडे सोशल मीडियाचे मजबूत नेटवर्क असून, अशा पद्धतीची तयारी न केल्यामुळे अखिलेश यादव नाराज आहेत, असा टोला देखील त्रिपाठी यांनी समाजवादी पक्षाच्या तयारीवरून मारला आहे. (Akhilesh Yadav)

सोशल मीडियावर सपाची ‘आ रहे है अखिलेश’ मोहिम

अखिलेश यादव यांच्या रथयात्रेसाठी जमलेल्या प्रचंड जनसमुदायामुळे उत्साही, सपा आता डिजिटल प्रचारात मागे पडल्याचे दिसत आहे. सोमवारी, सपा खासदार आणि ज्येष्ठ नेते प्रा रामगोपाल यांनी ट्विट करून निवडणूक आयोग पक्षपाती असल्याचा आरोप केला आहे. प्रोफेसर रामगोपाल यांनी ट्विट करून म्हटले आहे की, “ध्वजाचे बॅनर, पोस्टर होर्डिंग लावू शकत नाही, स्ट्रीट शो रॅलीही काढू शकत नाही. माध्यमांना विरोध दाखवता येत नसेल, तर अखिलेशच्या जाहीर सभांना होणाऱ्या गर्दीने घाबरून सरकारी पक्षाला साजेशी सर्व व्यवस्था केली जात असल्याचे रामगोपाल यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. मतदार सायकल ओळखतो आणि सायकलचे बटण दाबेल." असे ते म्हणाले. दरम्यान, सोशल मीडियावरील ‘आ रहे है अखिलेश’ मोहिमेद्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा सपाही प्रयत्न करत आहे.

सपाचे डिजिटल नियोजन (SP's Digital Planning For UP Elections)

- अखिलेश यादव यांच्या भाषणाच्या यूट्यूब, ट्विटर आणि फेसबुक लिंक शेअर केल्या जात आहेत. (YouTube, Twitter and Facebook)

- समाजवादी डिजिटल विंगची निर्मिती

- बूथ स्तरावर व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप तयार करून मतदारांना जोडले जाणार आहे

- सर्व नेते आणि कार्यकर्त्यांना सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर सक्रिय राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

- व्हर्च्युअल रॅलीसाठी झूम, मायक्रोसॉफ्टसारखे अ‍ॅप्स वापरण्याची तयारी

डिजिटल प्रचारात काँग्रेस सपापेक्षा पुढे

- प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) फेसबुकच्या माध्यमातून सातत्याने मतदारांशी संवाद साधत आहेत. काँग्रेसचा (Congress) प्रचार महिला मतदारांना त्यांच्या “लड़की हूं लड़ सकती हूं” या घोषणेने आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याशिवाय प्रियांका सोशल मीडियावर मतदारांशी थेट संवाद साधणार असून, यूपीच्या सर्व ब्लॉकमध्ये काँग्रेसतर्फे एलईडी स्क्रीन लावणार आहे.

- प्रचारासाठी काँग्रेसचे 75,000 व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आले आहेत.

- दिल्ली आणि लखनऊमध्ये सोशल मीडिया वॉर रूम स्थापन करण्यात आल्या आहेत.

डिजिटल प्रचारात बसपा मागे

या संपूर्ण डिजिटल मोहिमेत इतर पक्षांच्या तुलनेत बसपा मागे दिसत आहे, मायावतींची पत्रकार परिषद त्यांच्या सोशल मीडिया पेजवर थेट प्रक्षेपित केली जाते. बसपाने आत्तापर्यंत कोणतेही विशेष मोठे डिजिटल अभियान सुरू केलेले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com