'उत्तर प्रदेश' होतेय पोस्टर, बॅनर मुक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Code of Conduct
'उत्तर प्रदेश' होतेय पोस्टर, बॅनर मुक्त

'उत्तर प्रदेश' होतेय पोस्टर, बॅनर मुक्त

लखनौ : उत्तर प्रदेशात निवडणूक आचारसंहिता (Code of Conduct)लागू झाल्यामुळे स्थानिक प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी विविध राजकीय पक्षांचे फलक, (Banner)पोस्टर(Poster) काढण्याच्या कामास शनिवारी प्रारंभ केला. शनिवारी उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाली. उत्तर प्रदेशात(Uttar Pradesh) सात टप्प्यांत मतदान (Voteing)होणार आहे. राज्याच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे या फेऱ्यांचे आयोजन होईल.

हेही वाचा: ‘... तरच मुस्लिमाचे घर सुरक्षित राहील’

मुख्य निवडणूक अधिकारी अजयकुमार शुक्ला यांनी सांगितले की, राज्यात आदर्श निवडणूक आचारसंहिता लागू झाली असून तिचे पालन केले जाईल. सर्व जिल्हा दंडाधिकारी कार्यालयांतील अधिकाऱ्यांकडे अंमलबजावणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ते आपले अहवाल नियमित पाठवतील.

हेही वाचा: खाकी वर्दीवर रक्ताचा डाग; मद्यधुंद अवस्थेत डिलिव्हरी बॉयला उडवलं

लखनौचे जिल्हा दंडाधिकारी अभिषेक प्रकाश यांनी सांगितले की, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार काटेकोर कार्यवाही केली जात आहे. आचारसंहितेबाबतच्या सूचना महापालिका आयुक्तांना पाठविल्या आहेत. त्यानंतर शनिवारीच पोस्टर काढण्याचे काम सुरु करण्यात आले.बस्ती येथून आलेल्या वृत्तानुसार जिल्हा दंडाधिकारी सौम्या अगरवाल यांनी सांगितले की, सार्वजनिक मालमत्तांच्या ठिकाणी लावण्यात आलेली पोस्टर काढली जात आहेत.इटावा आणि फारुखाबाद येथूनही या आशयाची वृत्ते येत आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top