
ekyc for ayushman bharat yogi sarkar no 1
esakal
उत्तर प्रदेश सरकारने 23 सप्टेंबर रोजी ‘आयुष्मान भारत दिवस’ साजरा केला. या दिवशी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला (PMJAY) सात वर्षे पूर्ण झाली.राज्यात खास शिबिरे (कॅम्प्स) भरवण्यात आली होती आणि तिथे आयुष्मान कार्ड वाटण्यात आले. कार्ड वाटपामध्ये उत्तर प्रदेश आता देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे.
योगी सरकारच्या या योजनेच्या प्रभावी कामामुळे, कार्ड मिळण्यास पात्र असलेल्या कुटुंबांपैकी किमान ८७ टक्के कुटुंबातील एका व्यक्तीकडे आता आयुष्मान कार्ड आहे.
आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळतात. या योजनेचा लाभ सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्येही मिळतो. मात्र, आता या योजनेचा लाभ घेणाऱ्या कोट्यवधी कार्डधारकांना एक महत्त्वाचे काम करावे लागणार आहे, अन्यथा मोफत उपचारांपासून वंचित राहावे लागू शकते.