दलितांच्या 10 वेळा घरी जा.. तिथं चहा प्या, जेवण करा आणि मगच मत मागा..; भाजपाची कार्यकर्त्यांना सूचना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

UP Election 2022

मागासवर्गीय जाती-जमातीतील मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भाजपकडून वेगवेगळ्या युक्त्या आखण्यात येत आहेत.

'दलितांच्या 10 वेळा घरी जा.. तिथं चहा प्या, जेवण करा आणि मगच मत मागा'

नवी दिल्ली : आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Election 2022) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आता आपापली रणनीती आखण्यास सुरुवात केलीय. या निवडणुकीत 'हिंदुत्वा'सोबतच 'मागासवर्गीयांचा'ही मुद्दा भाजपनं उचलून धरलाय. भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी अलीकडेच भाजप नेत्यांची एक मोठी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना काही टीप्सही देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागासवर्गीय जाती-जमातीतील मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भाजपकडून वेगवेगळ्या युक्त्या आखण्यात येत आहेत. उत्तर प्रदेशमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी कार्यकर्त्यांना सल्ला दिलाय, की दलित बांधवांकडे अधिकाधिक जावे. त्यांच्यासोबत चहा घ्यावा, जेवण करावे, संपर्क वाढवावा आणि मगच मते मागावीत. यावेळी ओबीसी आणि उच्चवर्णीय समाजातील पक्ष कार्यकर्त्यांशी स्वतंत्र देव सिंह यांनी संवाद साधला. रविवारी आयोजित करण्यात आलेल्या 'ओबीसी सामाजिक प्रतिनिधी संमेलन' आणि 'वैश्य व्यापारी संमेलना'त ते बोलत होते.

हेही वाचा: चीन बनला जगातला सर्वात 'श्रीमंत देश'

स्वतंत्र देव सिंह पुढे म्हणाले, भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या तसेच शेजारच्या गावातील 100 दलित कुटुंबीयांशी संपर्क वाढवावा. त्यांच्यासोबत चहा-पाणी करावे. जेवण करावे. तसेच दलित समाजातील बांधवांना हे पटवून द्यावे की जात, क्षेत्र आणि पैशांसाठी नाही, तर राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर मते द्यावीत. जर तुम्ही एखाद्या घरी जाता आणि तिथं तुम्हाला चहाही विचारला जात नसेल तसचं तिथून निघून जाण्यसाठी सांगितलं जात असेल, तर 10 वेळा जाऊन तिथं चहा पिण्यासाठी प्रयत्न करत राहा, असंही त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना सांगितलं.

हेही वाचा: Election 2021 : राष्ट्रवादीच्या उमेदवारांपुढं तगडं आव्हान

loading image
go to top