राष्ट्रवादीच्या उमेदवारांपुढं तगडं आव्हान; बहुरंगी लढतीनं महिला मतदारसंघात चुरस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Women Constituency

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी महिला राखीवच्या एका जागेची मागणी केली होती.

Election 2021 : राष्ट्रवादीच्या उमेदवारांपुढं तगडं आव्हान

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेसाठी (Satara Bank Election) राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (Nationalist Congress Party) जागावाटपात महिला राखीव मतदारसंघातील एक जागा पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांना, तर दुसरी जागा बँकेचे अध्यक्ष व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinharaje Bhosale) यांच्याकडे गेली. त्यानुसार ऋतुजा पाटील, तर साताऱ्यातून विद्यमान संचालिका कांचन साळुंखे यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली. या दोघींविरोधात शेखर गोरे यांच्याकडून चंद्रभागा काटकर (कुकुडवाड), तर शारदादेवी कदम (गिरवी) यांची उमेदवारी आहे. बहुरंगी लढतींमुळे या मतदारसंघात चुरशीची लढत होणार आहे. राष्ट्रवादीकडे सर्वाधिक मते असली तरी विरोधातील उमेदवारांना राष्ट्रवादीतील नाराजांची मते मिळण्याची शक्यता आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जागा वाटपात महिला राखीवमधील एक जागा सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी मागून घेतली. त्यानुसार त्यांनी नागरी बँका व पतसंस्था मतदारसंघातील विद्यमान संचालक राजेश पाटील- वाठारकर यांच्या पत्नी ऋतुजा पाटील यांना उमेदवारी दिली. पाटणमधून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना यावेळेस सामावून घेताना त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या पत्नीसाठी एक जागा सोडण्याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांत चर्चा झाली होती; पण सहकारमंत्र्यांनी महिला राखीवमधील एक जागा मागून घेतल्याने देसाईंच्या पत्नीला उमेदवारी देण्याचा विषय बाजूला पडला. परिणामी, देसाई यांनी पाटण सोसायटीतून अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे पाटणची निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही.

हेही वाचा: Big Fight : कऱ्हाड सोसायटीत काँग्रेस-राष्ट्रवादीत काट्याची टक्कर

विद्यमान अध्यक्ष, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी महिला राखीवच्या एका जागेची मागणी केली होती. त्यानुसार जागा वाटपात एक जागा त्यांना देण्याचा निर्णय झाला; पण त्यासाठी बँकेचे माजी संचालक रवींद्र कदम यांच्या पत्नीचे नाव राष्ट्रवादीच्या यादीत प्रथम आले; पण ऐनवेळी हे नाव शिवेंद्रसिंहराजेंनी बदलले. त्यात कांचन साळुंखे यांना पुन्हा संधी दिली. त्यामुळे कदम व त्यांचे समर्थक नाराज झाले. जिल्हा बँकेच्या इतिहासात प्रथमच दुसऱ्यांदा संचालिका होण्याची संधी कांचन साळुंखे यांना मिळाली आहे. या दोघींशिवाय शारदादेवी कदम व चंद्रभागा काटकर याही रिंगणात आहेत. शारदादेवी कदम या माजी आमदार व माजी मंत्री सूर्याजीराव ऊर्फ चिमणराव कदम यांच्या पत्नी आहेत. माणचे शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्याकडून चंद्रभागा शंकर काटकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

हेही वाचा: Election 2021 : दहा जागांसाठी 20 उमेदवार रिंगणात

जिल्हा बँकेचे एकूण एक हजार ९६४ मतदार असून, हे सर्व मतदार महिला राखीव मतदारसंघातील उमेदवारांना मतदान करणार आहेत. त्यातील सर्वाधिक मतदार राष्ट्रवादीकडे आहेत. त्यामुळे पॅनेल टू पॅनेल मतदान झाल्यास सहकार पॅनेलमधील उमेदवारांना ही निवडणूक फारशी अडचणीची नाही; पण निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात नाराजांचे अनेक गट तयार झाले आहे. या नाराजांकडे असलेली मते निश्चितपणे विरोधी उमेदवारांकडे वळण्याची शक्यता आहे. परिणामी, महिला राखीवमधील राष्ट्रवादीच्या उमेदवारांना चुरशीची लढत द्यावी लागणार आहे.

हेही वाचा: आमदार शिंदे-रांजणे यांच्यात 'हाय होल्टेज' लढत

शेखर गोरेंमुळे तीन ठिकाणी आव्हान

शेखर गोरेंनी यावेळच्या बँकेच्या या निवडणुकीत स्वतः माण सोसायटीतून, तसेच ओबीसी प्रवर्गातून लढत आहेत. महिला राखीवमधूनही त्यांनी उमेदवार दिल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवारांपुढे तीन ठिकाणी आव्हान निर्माण झाले आहे. आघाडी धर्म पाळताना राष्ट्रवादीने शेखर गोरेंना बिनविरोध देण्याबाबतची भूमिका घ्यायला हवी होती, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने ते संतप्त झाले आहेत. परिणामी, त्यांनी तीन ठिकाणी राष्ट्रवादीच्या उमेदवारांपुढे आव्हान उभे केले आहे.

हेही वाचा: 'शिवशाहीर बाबासाहेबांची 'ही' इच्छा आता सरकारनच पूर्ण करावी'

loading image
go to top