होळीच्या धामधुमीत जोरदार हाणामारी; 4 ठार, 6 जण जखमी

UP Crime news
UP Crime newsesakal
Summary

होळीच्या धामधुमीत नेहमीप्रमाणं यावेळीही युपीत जोरदार हाणामारी झालीय.

होळीच्या धामधुमीत (Holi Festival) नेहमीप्रमाणं यावेळीही उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) हाणामारी झाली. शुक्रवारी उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात दोन गटांत रंग लावण्यावरून जोरदार वाद झाला. या वादाचं रुपांतर दगडफेकीत झालं. तर, प्रयागराजमध्ये (Prayagraj) भांडणात दोघांचा मृत्यू झालाय, तर संभलमध्ये काही बदमाशांनी मशिदीवर रंग फेकलाय.

यूपीच्या फतेहपूरमध्ये रंग लावण्यावरून दोन गटांत जोरदार वाद झाला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस (Police) घटनास्थळी दाखल झाले. यावेळी बदमाशांनी पोलिसांच्या वाहनांवर देखील दगडफेक केलीय. यात महिला पोलिसांसह अनेक पोलिस जखमी झालेत. त्यांना जवळच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. तर, गावकऱ्यांनी पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप करत हा संपूर्ण प्रकार पोलिसांच्या उपस्थितीत घडला. मात्र, पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचं सांगितलंय. दरम्यान, पोलिसांनी भाजपचे किशनपूर नगरपंचायत अध्यक्ष सुरेंद्र सोनकर आणि कौशांबी जिल्ह्यातील भाजपचे जिल्हा पंचायत अध्यक्ष जितेंद्र सोनकर यांना अटक केलीय.

UP Crime news
'केजरीवालांनी अण्णा हजारेंशी गद्दारी केली म्हणून आपचा जन्म झाला'

अमेठीत 2 जणांचा मृत्यू, 6 जण जखमी

अमेठीच्या बाबूपूर गावात होळीचा रंग लावण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी होऊन दोन जण ठार झालेत, तर 6 जण जखमी झाले आहेत. तर, प्रयागराजमध्ये होळीच्या उत्सवादरम्यान दारूच्या नशेत असलेल्या लोकांच्या दोन गटांत झालेल्या भांडणात दोघांचा मृत्यू झालाय. पीडितांपैकी एकाला काठीनं मारहाण करण्यात आली, तर दुसऱ्याला गोळ्या घालून ठार करण्यात आलंय. राहुल सोनकर (25) आणि संजय राजपूत (35) अशी मृतांची नावं आहेत. याशिवाय, संभळमध्ये होळी मिरवणुकीत काही लोकांनी मशिदीवर रंग फेकल्यानं इथं दगडफेक झाल्याची घटना घडलीय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com