esakal | रेमडेसिव्हीर मिळणार मोफत; योगी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

रेमडेसिव्हीर मिळणार मोफत; योगी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

रेमडेसिव्हीर मिळणार मोफत; योगी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

sakal_logo
By
टीम ई सकाळ

लखनऊ : कोरोनाच्या रुग्णांना मोठा दिलासा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे. योगी आदित्यनाथ यांनी घोषणा केलीय की, राज्यातील सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असणाऱ्या रुग्णांना मोफत रेमडेसिव्हीर इंजेक्शन दिले जाईल. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी आज मंगळवारी याबाबतची घोषणा केली आहे.

ही घोषणा करताना त्यांनी म्हटलंय की, सरकारी हॉस्पिटल्सना तर हे इंजेक्शन सरकारतर्फेच दिले जाईल मात्र खासगी हॉस्पिटल्समध्ये जर रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध नसेल आणि जर रुग्णासाठी हे अत्यंत आवश्यक असेल तर अशा परिस्थितीत डीएम आणि सीएमओ यांच्याकडून रुग्णासाठी हे इंजेक्शन उपलब्ध करवून दिलं जाईल.

हेही वाचा: मे महिन्याच्या मध्यानंतर कोरोना ओसरणार; IIT कानपूरच्या शास्त्रज्ञांचा दावा

काळाबाजार करणाऱ्यांवर नजर

मुख्यमंत्र्यांनी असे देखील आदेश दिले आहेत की, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये गरजेनुसार रेमडेसिव्हीरचा आवश्यक तो पुरवठा केला जाईल. योगी आदित्यनाथ यांनी असा इशारा दिला आहे की, जे लोक या औषधाच्या काळाबाजार करण्यामध्ये गुंतलेले दिसतील, त्यांच्याविरोधात एनएसएच्या अंतर्गत कारवाई केली जाईल.

याआधी काल सोमवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिला होता की, सरकारी अथवा खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना ऍडमिट करण्याला मनाई केली जाऊ शकत नाही. जर हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नसेल तर मग सरकार असो वा खासगी हॉस्पिटल, ते रुग्णांना परत पाठवू शकत नाही.

loading image