esakal | मे महिन्याच्या मध्यानंतर कोरोना ओसरणार; IIT कानपूरच्या शास्त्रज्ञांचा दावा
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Pandemic

उपचाराधीन केसेस १४ ते १८ मे आणि दररोजची आकडेवारी ४ ते ८ मे दरम्यान उच्चांकी असेल.

मे महिन्याच्या मध्यानंतर कोरोना ओसरणार; IIT कानपूरच्या शास्त्रज्ञांचा दावा

sakal_logo
By
वृत्तसंस्था

Corona Updates : नवी दिल्ली : भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) च्या शास्त्रज्ञांनी आता गणिताच्या आधारे एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. ज्यामुळे सर्वांच्या काळजीत आणखी भर पडणार आहे. भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट असून १४ ते १८ मे दरम्यान कोरोना रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठलेला असेल. त्यावेळी ३८ ते ४८ लाख लोक संक्रमित असतील. ४ ते ८ मे दरम्यान ४.४ लाखाचा टप्पा ओलांडला जाईल. भारतात सोमवारी (ता.२६) ३ लाख २३ हजार १४४ रुग्ण सापडले. तसेच २७७१ जणांना जीव गमवावा लागला. सध्या २८ लाख ८२ हजार २०४ जण सक्रिय रुग्ण आहेत.

आयआयटी कानपूर आणि हैदराबादच्या वैज्ञानिकांनी 'सूत्र' नावाच्या एका मॉडेलचा वापर करून एक अहवाल तयार केला आहे. त्यानुसार, मे महिन्याच्या मध्यापर्यंत उपचाराधीन केसेसची संख्या १० लाखाने वाढेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हेही वाचा: विजयी रॅलीवर बंदी; न्यायालयानं फटकारल्यानंतर निवडणूक आयोगाला आली जाग

गेल्या आठवड्यात संशोधकांनी असे भाकीत केले होते की, ११ ते १५ मे दरम्यान कोरोना साथीचे प्रमाण वाढू शकते आणि उपचाराधीन केसेसची संख्या ३३ ते ३५ लाखच्या आसपास असेल. आणि मे अखेरपर्यंत ती झपाट्याने कमी होत जाईल. या महिन्याच्या सुरवातीला १५ एप्रिलपर्यंत उपचाराधीन केसेसची संख्या सर्वाधिक असेल, असा दावा करण्यात आला होता, पण तो खोटा ठरला आहे.

आयआयटी कानपूरमधील संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक मनिंदर अग्रवाल म्हणाले की, 'या वेळी कमीक कमी आणि जास्तीत जास्त आकडेवारीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आणि या दरम्यानच वास्तविक आकडेवारी असेल, असा मला विश्वास आहे.'

हेही वाचा: विमानात बसले तेव्हा १८८ जण निगेटिव्ह; उतरले तेव्हा ५२ जणांना कोरोना

अग्रवाल यांनी रविवारी याबाबतची आकडेवारी ट्विटरवर प्रसिद्ध केली. ते म्हणतात, उपचाराधीन केसेस १४ ते १८ मे आणि दररोजची आकडेवारी ४ ते ८ मे दरम्यान उच्चांकी असेल. या दरम्यान ३८ ते ४८ लाख उपचाराधीन केसेस असतील, तर ३.४ ते ४.४ लाख रुग्ण दररोज सापडतील. पण अंतिम आकडेवारी काय असेल याबाबत स्पष्टता नाही. हा अहवाल अजून प्रसिद्ध केलेला नाही.

शास्त्रज्ञांनी सांगितले की, सूत्र मॉडेलमध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत. गौतम मेनन आणि हरयाणामधील अशोका विद्यापीठातील त्यांच्या टीमने एक स्वतंत्र आकडेवारी जाहीर केली होती. कोरोनाची सध्याची लाटेमुळे एप्रिलच्या मध्यापासून ते मेच्या मध्यापर्यंत सर्वोच्च आकडेवारी नोंदवली जाईल. अशा प्रकारच्या अंदाजांवर त्या कालावधीपुरता विश्वास ठेवला पाहिजे, असेही मेनन यांनी म्हटले होते.

loading image