Yogi Adityanath Mother Death: ''माझे भाऊ योगीजी...'', कंगना रणौत भावुक; योगी आदित्यनाथ यांच्या मातोश्रींच्या निधनानंतर व्यक्त केला शोक

Uttar Pradesh CM Yogi Adityanath: मुख्यमंत्री योगी यांच्या मातोश्रींच्या निधनावर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, मायावती आणि अखिलेश यादव यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी दुःख व्यक्त केले आहे.
Yogi Adityanath

Yogi Adityanath

esakal

Updated on: 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मातोश्री सावित्री देवी यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी उत्तराखंडमधील पौडी गढवाल जिल्ह्यात निधन झाले. या दुःखद बातमीनंतर अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत यांनी सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी पहिली प्रतिक्रिया देताना, "सर्वांत दुःखद बातमी" असं म्हटलं आहे. योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत.

Loading content, please wait...