‘एकदा संधी द्या, आम्ही शाळा आणि रुग्णालये बांधू’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arvind Kejriwal

UP Election : ‘एकदा संधी द्या, आम्ही शाळा आणि रुग्णालये बांधू’

लखनऊ : २०१७ मध्ये भाजपच्या सर्वांत मोठ्या नेत्याने स्मशान बनवायचे असेल तर शमशानही बनवा, असे सांगितले होते. जुन्या सरकारने यूपीमध्ये स्मशानभूमी आणि शमशानभूमी बांधली. यूपीमध्ये आम्हाला संधी द्या, आम्ही शाळा आणि रुग्णालये बांधू, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (arvind kejriwal) म्हणाले.

अरविंद केजरीवाल यांनी लखनऊच्या (Lucknow) स्मृती उपवन येथे जाहीर सभेत योगी सरकारसह मागील सरकारांवर निशाणा साधला. योगी सरकारने (yogi government) कोरोनाच्या काळात जनतेला काहीच मदत केली नाही. ऑक्सिजनअभावी लोक रस्त्यावर मरत राहिले आणि सरकार त्यांना ना उपचार देऊ शकले ना ऑक्सिजन. योगी सरकारने जाहिरातींवर करोडो रुपये खर्च केले. परिस्थिती अशी आहे की दिल्लीत योगींचे ८५० आणि आमचे १०६ होर्डिंग्ज आहेत, असे केजरीवाल (arvind kejriwal) म्हणाले.

हेही वाचा: एटीसीच्या परवानगीशिवाय विमानाने भरली उड्डाण; आता होणार चौकशी

केजरीवाल यांनी स्वत:ला बाबासाहेबांचे भक्त असल्याचे सांगून ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देऊन भाषणाची सुरुवात केली. मेळावा यशस्वी करण्यासाठी पक्षाच्या प्रदेश युनिटने सर्व पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवली होती. पक्षाचे प्रदेश प्रभारी आणि खासदार संजय सिंह यांच्याकडेही चार जिल्ह्यांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top