esakal | UP - माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांची प्रकृती गंभीर
sakal

बोलून बातमी शोधा

UP - माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांची प्रकृती गंभीर

रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण सिंह यांना लाइफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवण्यात आलं आहे.

UP - माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांची प्रकृती गंभीर

sakal_logo
By
सूरज यादव

लखनऊ - उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांची प्रकृती गंभीर झाली आहे. त्यांना लाइफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवण्यात आल्याची माहिती समजते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. कल्याण सिंह यांना SGPGI मध्ये दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण सिंह यांना लाइफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवण्यात आलं आहे.

कल्याण सिंह यांच्या प्रकृतीबाबत मेडिकल बुलेटिन जारी करण्यात आलं आहे. त्यानुसार कल्याण सिंह यांची तब्येत गंभीर आहे. मंगळवारी सांयकाळपासून त्यांना लाइफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवण्यात आलं आहे. SGPGI मधील वेगवेगळ्या विभागातील वरिष्ठ डॉक्टर कल्याण सिंह यांच्यावर उपचार करत आहेत. रुग्णालयाचे संचालक आर के धीमान हेसुद्धा कल्याण सिंह यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून आहेत.

हेही वाचा: उत्पन्नात 90 टक्क्यांनी घट झाल्याची 'मन की बात' ऐकली का?

राजस्थान आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून कल्याण सिंह यांनी काम पाहिले होते. 4 जुलै रोजी संसर्गामुळे आणि बेशुद्ध झाल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याआधी त्यांच्यावर राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार केले जात होते.

loading image