Hazratganj Accident : घराची भिंत कोसळून दोन मुलांसह 9 ठार

मुसळधार पावसामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Hazratganj Accident
Hazratganj Accident Sakal

Hazratganj Accident : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. हजरतगंज परिसरात भिंत कोसळून ९ जणांचा मृत्यू झाला आहे. कोसळलेली ही भिंत एका घराची अससल्याचे सांगितले जात आहे. या घटनेत दोन मुलांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करत चार लाख रुपयांची मदत देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

मुसळधार पावसामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. लखनौमध्ये कालपासून पावासाची धुवाँधार बॅटिंग सुरू आहे. यातच हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. सध्या घटनास्थळी कोसळलेल्या भिंतीचा ढिगारा बाजूला करण्याचे काम सुरू आहे. मात्र, सततच्या कोसळणाऱ्या पावसामुळे मदतकार्यात अडचणी येत आहेत.

Hazratganj Accident
Jitendra Awhad : शिंदे-फडणवीसांच्या आणखी एका निर्णयामुळे वातावरण तापणार?

हजरतगंज परिसरात अनेक जुनी घरे असून, कोसळलेले घर हे 100 वर्षे जुने असल्याचे सांगितले जात आहे. या संपूर्ण परिसरात छोट्या-छोट्या गल्ल्या असून, त्यामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. सध्या घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्धापातळीवर सुरू करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com