Jitendra Awhad : शिंदे-फडणवीसांच्या आणखी एका निर्णयामुळे वातावरण तापणार?

बंडखोरीनंतर सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने मविआ काळातील अनेक निर्णय रद्द करण्याचा धडाकाच मध्यंतरीच्या काळात लावला होता.
jitendra Awhad
jitendra Awhad Sakal
Updated on

Jitendra Awhad : बंडखोरीनंतर सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने मविआ काळातील अनेक निर्णय रद्द करण्याचा धडाकाच मध्यंतरीच्या काळात लावला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा शिंदे सरकारने राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का दिला आहे. शिंदे सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह दिसू लागली आहे.

jitendra Awhad
CUET UG Result 2022 : परिक्षेचा निकाल जाहीर; असा करा चेक

आव्हाडांच्या काळात घेण्यात आलेले म्हाडा संदर्भातील सर्व शासन निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच गृहनिर्माण विभागाशी संबंधित सर्व निर्णय म्हाडा आणि विभागीय मंडळाला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा हा आव्हाडांना मोठा धक्का मानला जात आहे. गुरुवारी याबाबतचे आदेशही जारी करण्यात आले आहेत. गृहनिर्माण विभागाचा कार्यभार हा सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे.

jitendra Awhad
Hazratganj Accident : घराची भिंत कोसळून दोन मुलांसह 9 ठार

नव्या निर्णयामुळे येथून पुढे सर्व अधिकार म्हाडा तसेच विभागीय मंडळांना देण्यात आले आहेत. त्यामुळे म्हाडाला यापुढे कोणताही निर्णय घेताना सरकारवर अवलंबून राहावे लागणार नाहीये. आव्हाडांच्या काळात एखाद्या निर्णयासाठी म्हडाला सरकारच्या परवानगीची वाट पहावी लागत होती. मात्र, आता सर्व निर्णय घेण्याची मुभा म्हाडा तसेच विभागीय मंडळांना देण्यात आली आहे.

jitendra Awhad
जितेंद्र आव्हाड यांचे अर्धनग्न चित्र प्रसारीत करणाऱ्या करमुसेवर दोषारोपपत्र दाखल

मविआ काळात आव्हाडांनी म्हाडाशी संबंधित अनेक निर्णय घेतले होते. तसेच म्हाडाचे सर्व अधिकार काढून घेत ते सरकारकडे घेतले होते. यामुळे अनेक गोष्टींसाठी म्हाडाला सरकारच्या होकारासाठी वाट बघावी लागत होती. आव्हाडांच्या या निर्णयामुळे म्हाडाला केवळ प्रस्ताव तयार करणे आणि ते सरकारी दरबारी पाठवणे एवढंच काम राहिलं होतं. म्हाडाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर वचक रहावा म्हणून हा निर्णय घेतल्याचे आव्हाडांनी त्यावेळी सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com