Loksabha election 2024 : मुख्तार अन्सारीच्या कबरीला भेट देणाऱ्या नेत्यांवर आदित्यनाथांचा हल्ला; म्हणाले...

Yogi Adityanath
Yogi Adityanathesakal

UP Lok sabha election 2024 : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुख्तार अन्सारीच्या कबरीला भेट देणाऱ्या नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. गाझीपूर येथे गँगस्टर मुख्तार अन्सारीची कबर आहे.

फतेपूर सीकरी येथे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दाखल झाले होते. यावेळी त्यांनी मुख्तार अन्सारीच्या कबरीला भेट देणाऱ्यांना खडे बोल सुनावले. ते म्हणाले की, हे सगळे लोक माफियाच्या कबरीवर जावून फातिहा पठण करत आहेत. त्यांना सांगा की, ही चांगली वेळ नाही. शेवटी लोक मतदान तर कमाळालाच करणार आहेत. तुम्हाला लोक आता पाच वर्षांची सुट्टी देणार आहेत.. आता फाहिता पठण करत राहा.

यावेळी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी कोणत्याही नेत्याचं अथवा आरोपीचं नाव घेतलं नाही. मुख्यमंत्र्यांनी मागच्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या समाजवादी पार्टी, एआयएमआयएम, बसपा आणि काँग्रेसच्या गाजीपूर दौऱ्यावर टिपण्णी केली. याशिवाय त्यांनी म्हटलं की, ज्या लोकांनी प्रभू श्रीराम आणि प्रभू श्रीकृष्णावर प्रश्न उपस्थित केले होते, त्यांना आता मतदान होणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com