बागपत : यूपी एसटीएफ (UP STF) आणि बागपत पोलिसांच्या संयुक्त कारवाईत 29 जून रोजी झालेल्या एन्काउंटरमध्ये 'सायको किलर' म्हणून कुप्रसिद्ध असलेला संदीप लोहार ठार (Sandeep Lohar Encounter) झाला. कधीकाळी कुस्तीगीर असलेला संदीप, एका वैयक्तिक दुःखानंतर हत्येच्या मार्गाला लागला होता.